डांगसौंदाणे येथील जलदुर्गा माता यात्रोत्सव उत्साहात

By Admin | Updated: May 8, 2014 17:52 IST2014-05-08T17:52:16+5:302014-05-08T17:52:16+5:30

डांगसौंदाणे : येथे अक्षय तृतीयेनिमित्त झालेला पारंपरिक ग्रामदैवत जलदुर्गा माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातारणात पार पडला. यात्रोत्सवात पहिल्या दिवशी सटाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान जायभावे व यात्रा कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक तुळजा भवानी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते ग्रामदैवत जलदुर्गा माता रथयात्रेची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घरोघरी पूजन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रथयात्रेसमवेत कुस्त्यांमध्ये देण्यात येणार्‍या बक्षिसांची ही मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जलदुर्गा मातेच्या दर्शनासाठी परिसरातून भाविकांनी हजेरी लावून यात्रेचा आनंद लुटला.

The Jaldhurga Mata Yatra Festival in Dangsawande | डांगसौंदाणे येथील जलदुर्गा माता यात्रोत्सव उत्साहात

डांगसौंदाणे येथील जलदुर्गा माता यात्रोत्सव उत्साहात

ंगसौंदाणे : येथे अक्षय तृतीयेनिमित्त झालेला पारंपरिक ग्रामदैवत जलदुर्गा माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातारणात पार पडला. यात्रोत्सवात पहिल्या दिवशी सटाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान जायभावे व यात्रा कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक तुळजा भवानी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते ग्रामदैवत जलदुर्गा माता रथयात्रेची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घरोघरी पूजन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रथयात्रेसमवेत कुस्त्यांमध्ये देण्यात येणार्‍या बक्षिसांची ही मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जलदुर्गा मातेच्या दर्शनासाठी परिसरातून भाविकांनी हजेरी लावून यात्रेचा आनंद लुटला.
ग्रामदैवत जलदुर्गा मातेच्या यात्रोत्सवानिमित्त आरम नदीपात्रात कुस्त्यांची विराट दंगल झाली. यात जिल्‘ातील कसमादेसह मनमाड, नगर, नामपूर, त्र्यंबकेश्वर, येवला, निफाड, मालेगाव, पानेवाडी, नांदगाव आदि भागांतून आलेल्या मल्लांनी भाग घेऊन आपापले कसब दाखवित उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कुस्तीसाठी यात्रा कमेटीकडून स्टिलची भांडी व मोठ्या स्वरूपात रोख रकमांचे बक्षिसे देण्यात आली. या कुस्तीच्या दंगलीतील मानाची कुस्ती चांदवड तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथील नारायण मार्तंड व लखमापुर येथील कारभारी वाघ यांच्यात होवुन त्यात नारायण मार्तंडने बाजी मारली. कुस्तीचे आयोजक संजय सोनवणे, माजी सरपंच डॉ. सुधीर सोनवणे, रवींद्र सोनवणे, सोपान सोनवणे, राजेंद्र सोनवणे, गणेश बोरसे यांच्याहस्ते मानाची कुस्ती लावण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेब सोनवणे, दिपक गांगुर्डे, संजय सोनवणे, भास्कर बच्छाव, ग्रामसेवक संदीप भामरे, अनंत दिक्षीत, कैलास सोनवणे, दिगंबर भदाणे आदी उपस्थित होते. अंतिम विजेता नारायण मार्तंड याला संजय सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख ५१०० रुपये व यंदाचा जलदुर्गा केसरीचा पुरस्कार बहाल करून गौरविण्यात आले.
यात्रोत्सव काळात ज्ञानेश्वरी देवी वृदांवन आळंदीकर यांचे जाहीर किर्तन, देवी मंदीरात हरिपाठ, महापुजा आदी कार्यक्रम संपन्न झाले. यात्रौत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महेंद्र सोनवणे, सुशिल सोनवणे, मनोहर सोनवणे, राजेंद्र चव्हाण, कैलास केल्हे, दिलीप पाठक, राहुल खैरनार, रतिलाल गांगुर्डे, अनंत वाघ, अशोक गांगुर्डे, आदीसह डांगसौंदाणे ग्रामपंचायत प्रशासन याता कमेटी, सामाजिक मित्रमंडळ आदीनी विशेष परिश्रम घेतले. पो.नि. भगवान जायभावे यांच्या मार्गदर्शनाखालील हवा. आर. के . काटकर, आर. पी. गवळी, राजेंद्र बागुल आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: The Jaldhurga Mata Yatra Festival in Dangsawande