शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्यानं काँग्रेसलाच फायदा, भाजपचं नुकसान; दिग्विजय सिंहांच्या मुलानं केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:00 IST

मध्ये प्रदेशातील गुनाचे खासदार सिंधिया यांनी मार्च 2020मध्ये भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबतच अनेक आमदारांनी काँग्रेसला राम-राम ठोकला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकार कोसळले होते.

ग्वाल्हेर - ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडून गेल्याने मध्य प्रदेशकाँग्रेसमधील गटबाजी संपली आहे. तर आत भाजपमध्येच तीन गट तयार झाले आहेत, असा दावा काँग्रेस नेते तथा दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह यांनी बुधवारी केला. शिंदे यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपचा भगवा हाती घेतला आहे.

मध्ये प्रदेशातील गुनाचे खासदार सिंधिया यांनी मार्च 2020मध्ये भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबतच अनेक आमदारांनी काँग्रेसला राम-राम ठोकला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकार कोसळले होते. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. सिंधिया यांना अलीकडेच मोदी सरकारमध्ये नागरी उड्डाण मंत्री करण्यात आले आहे.

ग्वाल्हेर भागातील पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी आलेले माजी मंत्री जयवर्धन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, "शिंदे होते तोपर्यंत पक्षात गटबाजी होती. आता ती संपली आहे. पण, शिंदे भाजपमध्ये गेल्याने तेथे 'शिवराज भाजप', 'महाराज भाजप' आणि 'नाराज भाजप',असे तीन गट तयार झाले आहेत. यावेळी, ज्या नेत्यांचे फोटो रेशन वितरणासाठी असलेल्या बॅगवर छापण्यात आले होते, त्या नेत्यांवरही टीका केली.  "या भागातील लोक पुराचा सामना करत असतानाच, सत्ताधारी पक्षाचे लोक मात्र 'अण्ण उत्सव' साजरा करत आहेत. खरे तर ही योजना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सुरू केली होती. एक दिवस भाजपचे हे नेते धान्यावरही त्यांचे फोटो छापतील," असा टोला जयवर्धन सिंह यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह