जेटलींच्या निधीतून होणार रायबरेलीत विकासकामे, हीरो वाजपेयी यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 23:47 IST2018-10-07T23:47:24+5:302018-10-07T23:47:39+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबाचा रायबरेली हा बालेकिल्ला मिळविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली खासदाराला असलेला मतदारसंघ विकासनिधी वापरणार आहेत.

जेटलींच्या निधीतून होणार रायबरेलीत विकासकामे, हीरो वाजपेयी यांची माहिती
लखनौ : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबाचा रायबरेली हा बालेकिल्ला मिळविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली खासदाराला असलेला मतदारसंघ विकासनिधी वापरणार आहेत. जेटली यांचे ‘प्रतिनिधी’ आणि उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते हीरो वाजपेयी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, महिनाभरापूर्वी जेटली यांनी राज्यसभेचे उत्तर प्रदेशातील खासदार या नात्याने रायबरेली जिल्ह्याची निवड केली. प्रमुख राजकीय कुटुंबाने प्रतिनिधित्व करूनही जिल्हा मागासलेला असणे आणि जिल्ह्यातून होत असलेल्या अनेक मागण्यांच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी या जिल्ह्याची निवड केली, असे वाजपेयी म्हणाले. खासदाराला स्थानिक विभाग विकास योजनेतून त्याच्या मतदारसंघात पाच कोटी रुपयांची त्याच्या पसंतीची विकासकामे जिल्हाधिका-यांना दरवर्षी सुचवता येतात. राज्यसभा सदस्य तो ज्या राज्यातून निवडून गेला आहे तेथील विकास कामांची शिफारस करू शकतो. हीरो वाजपेयी म्हणाले, जेटली नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात रायबरेलीचा दौरा करू शकतील.