शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

डोवालांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा 'प्लॅन', जैशच्या दहशतवाद्याकडून NSA कार्यालयाची रेकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 13:44 IST

डोवाल हे 2016 च्या उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट स्ट्राइकपासून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. उरी आणि बालाकोट स्ट्राइकमध्ये डोवालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्तींपैकी एक आहेत.

ठळक मुद्देअजीत डोवाल (Ajit Doval) यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे.डोवाल हे 2016 च्या उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट स्ट्राइकपासून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत.2019 मध्ये तयार करण्यात आला होता डोवालांच्या कार्यालयाचा व्हिडिओ.

नवी दिल्ली - जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) एका दहशतवाद्याने केलेल्या मोठ्या खुलाशानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोवाल (Ajit Doval) यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पाकिस्तान स्थित हँडलरच्या सांगण्यावरून आपण राजधानी दिल्लीत सरदार पटेल भवनासह इतर काही महत्वाच्या ठिकाणांची रेकी (टेहळणी) केल्याचा खुलासा या दहशतवाद्याने केला. (Jaish-e-Mohammed terrorist reveals pakistan plan to target nsa ajit doval)

डोवाल हे 2016 च्या उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट स्ट्राइकपासून पाकिस्तानातीलदहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. उरी आणि बालाकोट स्ट्राइकमध्ये डोवालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्तींपैकी एक आहेत. यासंदर्भात संरक्षण संस्था आणि केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे. 

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशचा दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिकच्या चौकशीतून त्याने डोवाल यांच्या कार्यालयाचा व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हिदायत-उल्लाह हा मुळचा शोपियनचा रहिवासी आहे. त्याला सहा फेब्रुवारीला अनंतनागमधून अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा सापडला होता. जम्मूतील गानग्याल पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात UAPAअंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तो जैशच्याच लष्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख आहे. 

2019 मध्ये तयार करण्यात आला होता डोवालांच्या कार्यालयाचा व्हिडिओ -हिदायत-उल्लाह 24 मे 2019 रोजी विमानाने श्रीनगरहून-दिल्लीला आला. होता येथे त्याने NSA कार्यालयाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ त्याने पाकिस्तानी हँडलर्सना पाठविल्याची माहिती दिली. यावेळी त्याने डोवालांच्या कार्यालयाशिवाय इतर ठिकाणांचीही रेकी केली होती. नंतर तो काश्मीरला परतला होता. त्याने 2019 मध्येच सांबा सेक्टरचीही पाहणी केली होती. यावेळी समीर अहमद डारही त्याच्यासोबत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. डारला पुलवामा हल्ल्याप्रकरणी 21 जानेवारी 2020 रोजी अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादी