शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर हल्ला करण्यासाठी जैश, आयएसआयची बैठक; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 10:07 IST

रावळपिंडीत जैश ए मोहम्मद आणि आयएसआसची बैठक; भारतावर मोठा हल्ला करण्याच्या योजनेवर चर्चा

नवी दिल्ली: भारतावर मोठा हल्ला घडवण्याची तयारी पाकिस्तानकडून केली जात आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच रावळपिंडीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयमध्ये एक गोपनीय बैठक झाली. यामध्ये भारतावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. या बैठकीची माहिती मिळताच भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.२० ऑगस्टला जैशचा दहशतवादी अमीर मौलाना अब्दुल रौफ असगरनं (मसूद अजहरचा भाऊ) रावळपिंडीत आयएसआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला अशगरचा भाऊ मौलाना अम्मारदेखील उपस्थित होता. बालाकोटवरील एअर स्ट्राईकनंतर भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तान सरकारनं सुटका केली. त्यानंतर अम्मारनं पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याची ध्वनीफित व्हायरल झाली होती. बालाकोट हल्ल्याचा बदला घेऊ, अशी धमकी त्यानं तालीम-उल-कुरानमधील मदरशात दिली होती.गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडीत अब्दुल रौफ आणि आयएसआयमध्ये एक बैठक झाली. या बैठकीचं आयोजन इस्लामाबादमधून करण्यात आलं होतं. जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी आणि कारी जरारनं भारतावरील हल्ले भारतावरील हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याच्या योजनेवर चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीच बैठक पुलवामा हल्ल्याच्या आधीदेखील झाली होती.कोण आहेत अशगर खान काश्मिरी आणि कारी जरार?अशगर खान काश्मिरी आधी दहशतवादी संघटना हरकतउल मुजाहिद्दीनच्या मजलिस ए शूराचा सदस्य होता. त्यानंतर त्यानं त्याच्या काही साथीदारांसह जैश-ए-मोहम्मद संघटनेत प्रवेश केला. तर कारी जरार पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या लॉन्चिंग पँडचा कमांडर आहे. २०१६ मध्ये नगरोटामधील लष्करी तळावर हल्ला झाला. जरार त्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदISIआयएसआय