शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, भाजपाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 15:21 IST

भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ जयराम ठाकूर यांच्या गळ्यात पडली आहे.  

सिमला - भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ जयराम ठाकूर यांच्या गळ्यात पडली आहे.   मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने निर्विवाद बहुमत मिळूनही हिमाचलमधील भाजपा नेत्यांममध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. त्यात अखेर हिमाचल प्रदेशमधील माजी भाजपाध्यक्ष जयराम ठाकूर यांनी बाजी मारली. 

 

भाजपाचे हिमाचल प्रदेशमधील माजी प्रदेशाध्यक्ष असलेले जयराम ठाकूर हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाल्यानंतर जयराम ठाकूर यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आले होते. दरम्यान, आज झालेल्या भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी जयराम ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर उपस्थित आमदारांनी या प्रस्तावास एकमताने समर्थन दिले. ठाकूर यांच्या निवडीची माहिती केंद्रीय पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

 

मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर जयराम ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते प्रेमकुमार धुमल यांचे आभार मानले. तसेच हिमाचलच्या जनतेने  आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही जयराम ठाकूर यांनी दिले. 

 हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेवरून दूर करून, सत्ता ताब्यात घेण्यात भाजपाला यश आले होते. ६८ जागांच्या विधानसभेतील ४४ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकल्या असून, मार्क्सवादी पक्षाने १ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या.  मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या ३६ तर भाजपाच्या २६ जागा होत्या.मात्र या निवडणुकीतील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा सुजानपूर मतदार संघात काँग्रेसचे राजिंदर राणा यांच्याकडून ३,५०० मतांनी पराभव झाला होता. धुमल यांचा हमीरपूर पारंपरिक मतदारसंघ, परंतु या वेळी त्यांनी तो बदलला. मतदानाच्या फक्त ९ दिवस आधी धुमल यांना पक्षाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते.

 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशHimachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017