यूएनईपी सल्लागार मंडळात जयराम रमेश

By Admin | Updated: December 15, 2014 03:10 IST2014-12-15T03:10:11+5:302014-12-15T03:10:11+5:30

विकसनशील देशांना पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल

Jairam Ramesh in the UNEP Advisory Board | यूएनईपी सल्लागार मंडळात जयराम रमेश

यूएनईपी सल्लागार मंडळात जयराम रमेश

नवी दिल्ली : विकसनशील देशांना पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल तंत्रज्ञानाबाबत संयुक्त राष्ट्राच्या संस्थेला धोरणात्मक सल्ला देणाऱ्या एका मंडळाच्या सदस्यपदावर माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळाचा (आयएबी) सदस्य म्हणून आपली सेवा देण्याचा प्रस्ताव आपण स्वीकृत केलेला आहे. आयएबी आंतरराष्ट्रीय पर्यावरण तंत्रज्ञान के ंद्राच्या (आयईटीसी) कार्यक्रमाच्या दिशेबाबत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) च्या कार्यकारी संचालकांना धोरणात्मक सल्ला देण्याचे काम करते. पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानाच्या संदर्भात विकसनशील देशांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने जपानच्या आसोका शहरात असलेल्या या आयईटीसीची स्थापना करण्यात आली आहे.

 

Web Title: Jairam Ramesh in the UNEP Advisory Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.