शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'ईडीकडे प्रश्नच नव्हते, सोनिया कितीही वेळ चौकशीस तयार होत्या', काँग्रेस नेत्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 18:19 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आजच्या ईडीच्या चौकशीबाबत मोठा दावा केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आजच्या ईडीच्या चौकशीबाबत मोठा दावा केला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडे आज सोनिया गांधी यांना विचारण्यासाठी कोणतेच प्रश्न नव्हते. सोनियांनी चौकशी पुढे ढकलण्यासाठी कोणतंच निवेदन दिलेलं नाही, समाजमाध्यमांमध्ये याबाबतच्या अफवा पसरवल्यात जात आहेत, असं जयराम रमेश यांनी सांगितलं. 

ईडीच्या दिल्लीतील कार्यालयात आज सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी हजेरी लावली. यात काही तासांनी सोनिया गांधी बाहेर देखील आल्या. सोनिया गांधींकडून यावेळी ईडीला तब्येतीचं कारण देत चौकशी पुढे ढकलण्यासाठी आणि लवकर संपवण्यासाठीचं निवेदन केलं. ते ईडीनं स्वीकारलं असं वृत्त प्रसारित केलं जात होतं. त्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. 

"ईडीनं म्हटलं की आमच्याकडे कोणतेच प्रश्न नाहीत. तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं. पण सोनियांनी स्वत: तुम्हाला मला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा मी रात्री ८-९ वाजले तरी चालतील मी तयार आहे असं म्हटलं. चौकशी संपवण्यासाठी सोनियांनी कोणत्याही प्रकारचं निवदेन ईडीला दिलेलं नाही हे मी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो. ईडीच्या सुत्रांकडून चालवल्या जाणाऱ्या या संदर्भातील बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही", असं जयराम रमेश म्हणाले. 

जवळपास तीन तास चौकशीनॅशनल हेराल्ड प्रकरणाशी निगडीत मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये सोनिया गांधी यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोनिया यांची जवळपास तीन तास चौकशी केली. दुपारी जवळपास साडेबाराच्या सुमारास चौकशीला सुरुवात झाली. सोनियांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभर निदर्शनं करण्यात आली. अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज तीन तासांच्या चौकशीनंतर सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय