जयपूर ग्रामीणमधील चाकसू परिसरात शुक्रवारी सकाळी नॅशनल हायवे-५२ वर एका भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. भाविकांनी भरलेली कार एका ट्रेलरला धडकल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाचव्या भाविकाचा रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला.
सर्व भाविक मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ते राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात दर्शनासाठी येत होते. मिळालेल्या माहितीनुसार या भाविकांनी एक दिवसापूर्वी उज्जैनमध्ये महाकालचे दर्शन घेतलं होतं आणि तिथून ते खाटू श्यामसाठी रवाना झाले होते. मात्र मंदिरापासून काही अंतरावर असतानाच हा अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाला डुलकी लागल्यामुळे वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट समोरच्या ट्रेलरमध्ये घुसली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली, परंतु पाचही जणांचा जीव वाचवता आला नाही. या अपघातानंतर नॅशनल हायवे-५२ वर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. अपघातामुळे काही काळ या मार्गावर कोंडी निर्माण झाली होती, जी पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणली. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे.
Web Summary : Five pilgrims died in a horrific highway accident near Jaipur. Their car collided with a trailer while traveling to Khatu Shyam temple after visiting Ujjain. The car was completely wrecked, causing immediate fatalities and major traffic disruptions.
Web Summary : जयपुर के पास राजमार्ग पर भीषण दुर्घटना में पांच तीर्थयात्रियों की मौत हो गई। उज्जैन से खाटू श्याम मंदिर जाते समय उनकी कार एक ट्रेलर से टकरा गई। कार बुरी तरह क्षतिग्रस्त हो गई, जिससे मौके पर ही मौतें हुईं और यातायात बाधित हो गया।