विशाल दादलानीने कान पकडून मागितली जैन मुनींची माफी

By Admin | Updated: September 21, 2016 13:46 IST2016-09-21T13:22:26+5:302016-09-21T13:46:55+5:30

चंदीगडमध्ये तरूण सागर यांच्या आश्रमात जाऊन प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानीने जैन संत तरुण सागर यांची माफी मागितली

Jain Muni apologizes for asking for huge Dadlani | विशाल दादलानीने कान पकडून मागितली जैन मुनींची माफी

विशाल दादलानीने कान पकडून मागितली जैन मुनींची माफी

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.21- प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानीने बुधवारी पुन्हा एकदा जैन संत तरुण सागर यांची माफी मागितली . यावेळी चंदीगडमध्ये तरूण सागर यांच्या आश्रमात जाऊन त्याने त्यांची कान पकडून माफी मागितली. तरूण सागर यांनी विशालला त्याचे कान पकडून माफी मागायला सांगितलं आणि त्यानेही त्यांनी सांगितल्याप्रमाणे माफी मागितली. 
 
यापुर्वी 29 ऑगस्टला हरियाणा पोलिसांनी विशाल विरोधात एफआयआर दाखल केली होती.  हरियाणाच्या विधिमंडळात जैन संत तरुण सागर यांनी दिलेल्या व्याख्यानाबाबत त्याने उपहासात्मक ट्‌विट केलं होतं. त्यानंतर मोठ्या वादाला सुरूवात झाली होती व दादलानीवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर विशालने या प्रकरणी माफी मागत आपले संबंधित ट्‌विट काढून टाकले होते. 
 

Web Title: Jain Muni apologizes for asking for huge Dadlani