बाहुबली येथे जैन संघटनेचे अधिवेशन

By Admin | Updated: January 9, 2016 02:36 IST2016-01-09T02:36:08+5:302016-01-09T02:36:08+5:30

बाहुबली (जि. कोल्हापूर) : भारतीय जैन संघटनेचे ११वे द्वैवार्षिक अधिवेशन रविवारी बाहुबली (कुंभोजगिरी, ता. हातकणंगले) येथे होणार आहे. संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांसोबतच राज्यातील पाच ते सात हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Jain Association's convention at Bahubali | बाहुबली येथे जैन संघटनेचे अधिवेशन

बाहुबली येथे जैन संघटनेचे अधिवेशन

हुबली (जि. कोल्हापूर) : भारतीय जैन संघटनेचे ११वे द्वैवार्षिक अधिवेशन रविवारी बाहुबली (कुंभोजगिरी, ता. हातकणंगले) येथे होणार आहे. संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांसोबतच राज्यातील पाच ते सात हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओसवाल म्हणाले, महाराष्ट्रातून सुरू झालेले जैन संघटनेचे काम सध्या अनेक राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. केवळ जैनच नाही, तर सर्वच समाजातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. लातूर, गुजरातमधील भूज, उत्तराखंड व जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप पीडितांना मदत असो अथवा नैसर्गिक आपत्ती सर्वच ठिकाणी संघटनेने भरीव मदत केली आहे. बाहुबली येथे होणार्‍या अधिवेशनात पुढील दोन वर्षांमध्ये संघटनेच्या वतीने करण्यात येणारे सामाजिक काम, शेतकरी व शेतीसाठीचे प्रयत्न त्याचबरोबर जैन समाजासमोरील अडचणींवर चर्चा केली जाणार आहे.
व्यवसायाच्या निमित्ताने जैन समाज देशभरात विखुरलेला आहे. त्यांना एकत्र करणे व समाजासाठी विधायक कार्य करण्याचे यशस्वी प्रयत्न करीत आहे. या अधिवेशनामध्ये अल्पसंख्यांक जैन समाजाला भेडसावणारे प्रश्न याबाबतही विचारमंथन होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी उद्घाटन होईल.
राज्य अधिवेशनात नवीन अध्यक्षांची घोषणा होणार आहे. अधिवेशनासाठी बाहुबली येथे साधारण वीस ते पंचवीस हजार श्रावक बसतील एवढा मंडप उभारण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jain Association's convention at Bahubali