राजस्थानातील भाजप आमदार बालमुकुंद आचार्य हे सातत्याने चर्चेत असतात. आता, त्याचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते व्हेज बिर्याणी विकणाऱ्या एका व्यक्तीवर संतापलेले दिसत आहेत. कारण या व्यक्तीने आपल्या स्टॉलवर बाबा श्याम यांचा फोटो आणि 'जय श्री श्याम', असे लिहिले होते. यावेळी त्यांनी, बिर्याणी हे मुघल अन्न असल्याचे म्हणत, बिर्याणीसोबत बाबा श्याम यांचे नाव लिहू नये, असे आवाहन संबंधित बिर्याणी विक्रेत्याला केले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बालमुकुंद आचार्य म्हणाले, हे मुघली अन्न आहे मुघली. श्याम हे सनातनचे देवता आहेत, त्यांचे नाव येथे लिहिने योग्य आहे का? त्यांचा फोटो येथे लावणे योग्य आहे की? आपल्याला बिर्याणी विकायची आहे विका. मात्र देवाचा फोटो लाऊ नका. आता आपण लीहाल श्याम चिकन. आपण डायरेक्ट बिर्यानी लिहा. मात्र, देवाचे नाव लिहू नका आणि फोटो वापरू नका.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना बालमुकुंद आचार्य म्हणाले, आज मी रस्त्याच्या कडेला एक फूड स्टॉल बघितला. ज्याला आमचे पूज्य बाबा श्याम यांचे नाव देण्यात आले होते आणि त्यावर त्यांचा फोटोही आहे. हे पाहून मन प्रचंड दुखावले, कारण आपल्या देवी-देवतांचे नाव अशा प्रकारच्या कामांशी जोडणे, अयोग्यच नाही तर आपल्या आस्थेचाही अपमान आहे.
बालमुकुंद आचार्य म्हणाला, मी स्टॉल मालकाला शांतपणे समजावून सांगितले आहे की, व्यवसाय करणे हा तुमचा अधिकार आहे. मात्र कोणत्याही स्वरूपात धर्माचा अपमान स्वीकारार्ह नाही. सनातन संस्कृतीची प्रतिष्ठा राखली जावी. हाच आमचा संकल्प आहे.