शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

राष्ट्रीय पुरस्कारांत ‘जय महाराष्ट्र’, 4 बालकांचा मोदींच्याहस्ते ऑनलाईन सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 9:15 AM

नवसंशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बालकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. पदक, एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

नवी दिल्ली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते सोमवारी आभासी पद्धतीने महाराष्ट्रातील चार बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधानांनी चौघांच्या शाैर्याची व सुप्त गुणांची प्रशंसा केली. देशातील २१ राज्यांतील ३२ बालकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  क्रीडा, शाैर्य, नवसंशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बालकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. पदक, एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शिवांगी काळे (जळगाव)केवळ सहा वर्षांची असलेल्या शिवांगीची वीरता या श्रेणीत निवड झाली. विजेत्यांमध्ये ती सर्वात लहान आहे. समयसूचकता दाखवून हिने आईला विजेचा शॉक लागल्यानंतर आईसह लहान बहिणीचे प्राण वाचवले. 

जिया राय (मुंबई)अवघ्या तेरा वर्षीय जियाला क्रीडा क्षेत्रातील  कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला. जिया उत्तम ओपन वॉटर पॅरा स्वीमर असून तिने ओपन वाॅटर पॅरा स्वीमिंगमध्ये विश्वविक्रम केला. 

जुई केसकर (पुणे)१५ वर्षाच्या जुईला नवसंशाेधनासाठी हा पुरस्कार मिळाला. पार्किन्सन्सच्या रुग्णांसाठी तिने हातमाेजे तयार केले आहेत. त्यामुळे रुग्णांना हालचाली सुकर झाल्या. उपकरणाला जे ट्रेमर थ्रीडी म्हटले जाते. तिने काकांना आठ वर्षे या आजाराशी झुंजताना पाहिले होते.

nस्वयम् पाटील (नाशिक)१४ वर्षांचा दिव्यांग जलतरणपटू स्वयम् याला क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला आहे. त्याने वयाच्या १० व्या वर्षी पाच किलाेमीटर व १३ व्या वर्षी १४ किलाेमीटर अंतर पाेहून विश्वविक्रमाची नाेंद केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली