शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 06:21 IST

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट,  प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाल्यामुळे गृहमंत्री अमित शाह व भाजपचा विरोध करण्यासाठी गुरुवारी विरोधी पक्षाचे अनेक खासदार संसद परिसरात निळे कपडे घालून आंदोलन केले. त्यांच्यासमोर सत्ताधारी सदस्यांनीही आंदोलन केले. संसद परिसर ‘जय भीम’च्या नाऱ्याने दणाणून गेला. 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट,  प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते. 

शाह यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. सभापती जगदीप धनखड यांच्याकडे खरगेंनी नोटीस सुपुर्द केली. शाह यांनी १७ डिसेंबर रोजी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ‘संविधानाचा ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील चर्चेचे उत्तर देताना आंबेडकरांचा अवमान केला. 

उत्तर प्रदेश विधानसभेतही गदारोळ

शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काढलेल्या उद्गारांबाबत उत्तर प्रदेश विधानसभेत समाजवादी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ माजविला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. शाह यांनी आंबेडकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी बसपच्या प्रमुख मायावती यांनी केली. कर्नाटक विधानसभेत बाकांवर डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र.

 

टॅग्स :ParliamentसंसदMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAmit Shahअमित शाहDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर