शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

Jahangirpuri Demolition: जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर राजकारण तापले, आज JNU-जामियामध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 08:33 IST

Jahangirpuri Demolition: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर एमसीडीकडून अवैध मालमत्तांविरोधात कारवाई करण्यात आली. यादरम्यान, 2 तासात 7 बुलडोझरने 12 दुकाने पाडण्यात आल्या.

नवी दिल्ली: जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर(Jahangirpuri Violence) उत्तर दिल्ली महानगरपालिकेने परिसरातील बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम (Jahangirpuri Demolition) सुरू केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बुलडोझर चालवण्याची कारवाई थांबवण्यात आली. मात्र, त्याआधीच बुलडोझरने अनेक बांधकामे जमीनदोस्त केली होती. या मुद्द्यावरून राजकारणा चांगलेच तापले असून, आज याविरोधात जेएनयू आणि जामियामध्ये निदर्शने होणार आहेत. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

काँग्रेस-तृणमूलचा कारवाईला विरोधऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी या कारवाईतील पीडित लोकांना भेटण्यासाठी जहांगीरपुरी येथे पोहोचले होते, मात्र त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले. त्यानंतर आता काँग्रेस (Congress), तृणमूल काँग्रेस (TMC) यांनीही त्यांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जहांगीरपुरीला पाठवण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, डावी विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA), काँग्रेसची विद्यार्थी संघटना, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) यांनी एमसीडीच्या या कृतीविरोधात आंदोलन पुकारले आहे.

जामिया आणि JNU मध्ये आंदोलनAISA ने आज दुपारी 2 वाजता जामिया येथे आंदोलनाची घोषणा केली आहे. देशभरात मुस्लिमांवर होत असलेले अत्याचार, अन्याय, जहांगीरपुरीतील गरिबांच्या घरांवर, दुकानांवर आणि प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवल्या जात असल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही एनएसयूआयने म्हटले आहे. NSUI च्या JNU युनिटने आज म्हणजेच 21 एप्रिल रोजी गंगा ढाबा ते साबरमतीपर्यंत आंदोलन पुकारले आहे.

काँग्रेस-तृणमूलचे शिष्टमंडळ जहांगीरपुरीला जाणार 15 काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ जहांगीरपुरीच्या बाधित भागात जाणार आहे. काँग्रेसच्या या शिष्टमंडळात अनिल चौधरी, शक्ती सिंह गोहिल, अजय माकन तसेच सुभाष चोप्रा, हारून युसूफ, देवेंद्र यादव, इम्रान प्रतापगढ़ी आणि कृष्णा तीरथ यांचा समावेश आहे. याशिवाय,टीएमसीचेही 5 खासदारांचे शिष्टमंडळ जहांगीरपुरीला जाणार आहे. दुसरीकडे, सीपीआयएम (CPIM) नेत्या वृंदा करात यांनी जहांगीरपुरीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन