शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:10 IST

Jagdeep Dhankhar: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल अचानक पदाचा राजीनामा दिला आहे.

Jagdeep Dhankhar: भारताचे उपराष्ट्रपती यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असला तरी, विरोधकांकडून वेगळाच संशय व्यक्त होतोय. दरम्यान, धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपतीच्या नावाबाबत कवायती सुरू झाल्या आहेत. अशातच, बिहारमधील भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करण्याची मागणी केली आहे.

जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?

भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल म्हणाले की, जर नितीश कुमार उपराष्ट्रपती बनले, तर यापेक्षा चांगले काय असू शकते. ही बिहारसाठी अभिमानाची बाब असेल. भाजप आमदाराच्या या मागणीनंतर राजकीय हालचाली वाढणार आहेत. कारण वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री नितीश यांना उपराष्ट्रपती बनवण्याच्या मागणीचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. मात्र, याबाबत स्वतः मुख्यमंत्री नितीश यांनी कोणतेही विधान केलेले नाही.

यापूर्वीही अशी मागणी करण्यात आली मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल वेळोवेळी अनेक अटकळ आणि मागण्या करण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी नितीश कुमार यांना देशाचे उपपंतप्रधान बनविण्याची मागणी केली होती. त्यावेळीही चौबे यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री नितीश यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने आधीच सांगितले आहे की, ते नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतील. अशा परिस्थितीत, या नवीन मागणीने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडNitish Kumarनितीश कुमारPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारतBiharबिहारElectionनिवडणूक 2024