भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी जगदाळे

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30

निमोणे : करडे (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दादाभाऊ जगदाळे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत दिवेकर यांची बिनविरोध निवड झाली.

Jagdale as President of Bhairavnath Society | भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी जगदाळे

भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी जगदाळे

मोणे : करडे (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दादाभाऊ जगदाळे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत दिवेकर यांची बिनविरोध निवड झाली.
संचालक मंडळाची निवड नुकतीच बिनविरोध झाली. यामध्ये दादाभाऊ जगदाळे, पोपट वाळके, अशोक पळसकर, विरसिंग पाचर्णे, नीलेश लोखंडे, चंद्रकांत दिवेकर, रुख्मिणी पाचर्णे, तारामती लोखंडे, एकनाथ घायतडक, बाळू खोमणे हे दहा संचालक बिनविरोध निवडून आले. त्यानंतर संस्थेच्या कार्यालयात विशेष सभा झाली. त्यामध्ये दादाभाऊ मनाजी जगदाळे यांची चेअरमन, तर चंद्रकांत बबन दिवेकर यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बी. एन. गवळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी सचिव शरद भोसले, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. ही निवड बिनविरोध होण्यासाठी माजी उपसरपंच बबनराव वाळके, शिरूर मार्केट कमिटीचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांनी प्रयत्न केले.

Web Title: Jagdale as President of Bhairavnath Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.