जगनमोहन रेड्डी रुग्णालयात

By Admin | Updated: October 14, 2015 00:56 IST2015-10-14T00:56:48+5:302015-10-14T00:56:48+5:30

वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष, विधानसभेतील विरोधी पक्षनेते वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण

Jaganmohan Reddy Hospital | जगनमोहन रेड्डी रुग्णालयात

जगनमोहन रेड्डी रुग्णालयात

गुंटूर : वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष, विधानसभेतील विरोधी पक्षनेते वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण पुकारल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना बळजबरीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना नाल्लापुडू येथील उपोषण शिबिरावरून पहाटे ४.३० वाजता अ‍ॅम्ब्युलन्सने गुंटूर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी असंख्य समर्थकांनी पोलिसांना मज्जाव केला होता. त्यांच्या शरीरातील किटोनचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना किडनीशी संबंधित समस्या निर्माण होऊन गुंतागुंत वाढू शकते, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Jaganmohan Reddy Hospital