जगद्गुरू श्री विष्णुस्वामी वल्लभाचार्यनगरात गिरीराज पर्वताचा विशाल देखावा
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30
जगद्गुरू श्रीवल्लभा महाप्रभू पंचशताब्दी महोत्सव वर्ष

जगद्गुरू श्री विष्णुस्वामी वल्लभाचार्यनगरात गिरीराज पर्वताचा विशाल देखावा
ज द्गुरू श्रीवल्लभा महाप्रभू पंचशताब्दी महोत्सव वर्षनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममध्ये औरंगाबादरोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराच्या समोरच जगद्गुरू श्रीमद्विष्णुस्वामी वल्लभाचार्यनगरात श्री विर्लश महाप्रभू पंचशताब्दी महोत्सावानिमित्त ६० फुटी गिरीराज पर्वताचा विशाल देखावा साकारण्यात आला असून, भाविकांचे आकर्षण ठरत आहे.साधुग्राम सेक्टर एफ-डी, पाण्याच्या टाकीजवळ, तपोवन येथे श्रीमद्विष्णुस्वामी वल्लभाचार्य नगरात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, भागवतकथा व रासलीला भाविकांची गर्दी होत आहे. तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सवाची तयारी गिरीराज पर्वत म्हणजेच गोवर्धन पर्वत असून, या पर्वताची कथा भगवान कृष्णाशी संबंधित आहे. श्रीकृष्ण आपल्या बालसवंगड्यांसमवेत रानावनात गायी चारताना त्यांनी इंद्राची पूजा करण्याऐवजी गोवर्धन पर्वाची पूजा केली, कारण या पर्वावर उगविणार्या गवतावरच गोकुळातील गायींचे पालन पोषण होत असे. या पूजेचा राग येऊन इंद्राच्या आज्ञेने पावसाने जोरदार पर्जन्यवृष्टी केली. त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून घेतला, परंतु हा पर्वत गोपसवंगड्यांनी उचलला असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले असा या पवित्र गिरीराज पर्वताची प्रतिकृती साधुग्राममधील भाविकांना बघता यावी म्हणून दगड, माती आणि प्लायवूड यांच्या सहाय्याने उभारण्यात आली आहे. या पर्वतावर भगवान श्रीनाथजींचे मंदिर उभारून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला यानिमित्त महोत्सव करण्यात येणार आहे. तसेच भाविकांना पर्वताभोवती फेरी (प्रदक्षिणा) मारण्याची सोय करण्यात आली आहे. सिंहस्थ पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला असून, यात श्रीमद्भागवत कथा, सत्संग आदिंचा समावेश असणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. (प्रतिनिधी)