शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

कौमार्य म्हणजे सीलबंद बाटली; वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्राध्यापकाची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 11:37 IST

महिलांच्या कौमार्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठित जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

ठळक मुद्देमहिलांच्या कौमार्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठित जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. महिला आयोगाकडून चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कनक यांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

कोलकाता - महिलांच्या कौमार्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठित जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. महिलांच्या कौमर्याविषयी प्राध्यापक कनक सरकार यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. महिला आयोगाकडून चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कनक यांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

लग्न न झालेली मुलगी तरुणांसाठी परीप्रमाणे असते, असं सरकार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. 'मुलगी जेव्हा जन्माला येते, तेव्हा ती सील पॅक्ड असते. कुमारवयीन मुलीचा संबंध संस्कृती, मूल्य आणि लैंगिक स्वच्छतेशी असतो. कुमारी मुलगी पत्नी म्हणून मिळाल्यास होणारे फायदे मुलांना माहीत नसतात. त्यामुळे अनेक मुलं मूर्ख बनतात,' असं सरकार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. 'कोल्ड्रिंकच्या बाटलीचं सील तुटलं असेल, तर तुम्ही ती खरेदी करता का?' असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.

आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी अभ्यास करणाऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या समितीने कनक सरकार यांना हटवण्याची मागणी केली होती. तसेच त्यांना विद्यापीठात येण्यापासून रोखण्यात आलं आहे. कनक सरकार यांच्या वक्तव्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाल्याची प्रतिक्रिया कुलुगरु सुरंजन दास यांनी दिली आहे. कनक सरकार यांच्या या पोस्टवर चौफेर टीका झाली. याबद्दल एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना, हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून मी काहीच चुकीचं बोललो नाही, अशी प्रतिक्रिया सरकार यांनी दिली होती. मात्र त्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट डिलीट केली आणि त्यांच्या पोस्टबद्दल स्पष्टीकरण दिलं. मी कायमच महिलांच्या अधिकारांचं समर्थन केलं आहे, असा दावा सरकार यांनी केला होता. यासाठी त्यांनी फेसबुकवरील जुन्या पोस्टचा संदर्भ दिला.

टॅग्स :Womenमहिलाuniversityविद्यापीठFacebookफेसबुक