शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:37 IST

Indian Army Action: जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते.

Indian Army Action: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने भारतात घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येकवेळी भारतीय सैन्य हे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहे. दरम्यान, कालही (२९ जून २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैनाने हा प्रयत्न उधळून लावला. या दरम्यान एका पाकिस्तानी गाईडला अटक करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे भारतीय सैन्याने बीएसएफच्या सहकार्याने सापळा रचला. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या ४-५ सशस्त्र दहशतवाद्यांच्या हालचाली सैनिकांनी पाहिल्या. या संयुक्त कारवाईदरम्यान, एका व्यक्तीला अटक करण्यात आली. हा व्यक्ती पाकिस्तानी गाईड असून, तो घुसखोरीला मदत करत होता. या कारवाईत, पळून जाण्याचा प्रयत्न करताना जैशचे चार दहशतवादी जखमी झाले आहेत.

शोध मोहिमेदरम्यान मोबाईल आणि पाकिस्तानी चलन जप्तगाईडला अटक केल्यानंतर सैन्याने परिसरात शोध मोहीम राबवली. या दरम्यान मोबाईल फोन आणि पाकिस्तानी चलनासह अनेक संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या चौकशीत अटक केलेल्या व्यक्तीने सांगितले की, तो नियंत्रण रेषेजवळील पीओकेचा रहिवासी असून, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करतो. या गाईडने पुष्टी केली की, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळ्यासह इतर आक्षेपार्ह साहित्य घेऊन भारतात येत होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवान