शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'आता परत सत्तेत येणे अवघड...', काँग्रेसच्या भवितव्याबाबत शशी थरुर यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:52 IST

Shashi Tharoor : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा तीन विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.

Shashi Tharoor : गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसने चांगले प्रदर्शन केले, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या हाती मोठी निराशा आली. नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत तर पक्षाला सलग तिसऱ्यांदा भोपळा मिळाला. यातच आता खासदार शशी थरुर यांनी काँग्रेसच्या भवितव्यावर  महत्वाची टिप्पणी केली आहे. 

शशी थरुर म्हणतात की, तुम्हाला देशात बदल घडवून आणायचा असेल, तर एकटे लढून चालणार नाही, तर इतर पक्षांना सोबत घ्यावे लागेल. यूपी आणि बिहारमध्ये आम्ही आघाडी करुनच पुढे जाऊ शकतो. दिल्लीत पक्ष तीन वेळा सत्तेबाहेर असल्याने दिल्लीत पुनरागमन कठीण आहे. कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षाचा उल्लेख करत थरुर म्हणतात, काँग्रेस आज प्रत्येक राज्यात एक-दोन जागावर आहे, मात्र इतर पक्ष केवळ एक दोन राज्यांपुरते मर्यादित आहेत.

अशी अनेक राज्ये आहेत, जिथे काँग्रेस आघाडी करुनच पुढे जाऊ शकते. उदाहरणार्थ, काँग्रेस 1996 पर्यंत यूपीमध्ये स्वबळावर सत्तेत होती आणि सरकारही चालवले, पण आता त्याची शक्यता फारच कमी आहे. समाजवादी पक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षाशी युती करूनच आपण पुढे जाऊ शकतो. बिहारमध्येही तेच आहे. तमिळनाडूतही आमची द्रमुकसोबत आघाडी आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याची कहाणी वेगळी आहे.

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस जी ताकद दाखवू शकते, ती पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखवू शकणार नाही, पण आम्ही वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. देशात बदल घडवून आणायचा असेल, तर प्रत्येकवेळी स्वबळावर लढण्याची गरज नाही. एकाच विचारधारेच्या इतर पक्षांसोबत पुढे जाता येऊ शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले. यावरुन आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करणार असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा