शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"लेबल कुछ है, माल कुछ है...! हे कट्टर भ्रष्टाचाऱ्यांचं सम्मेलन"; विरोधकांवर मोदींचा थेट हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपला भारत देश कुठून कुठे पोहोचू शकला असता. आम्हा भारतीयांचं  सामर्थ्य कधीच कमी नव्हतं. मात्र, भ्रष्ट आणि घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर अन्यात केला आहे.

बेंगळुरु येथे होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी थेट हल्ला चढवला. ही बैठक म्हणजे, भ्रष्टाचाऱ्यांचे सम्मेलन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे लोक अमर्याद भ्रष्टाचार करतात. हे लोक आता बेंगळुरूमध्ये जमले आहेत, असे मोदी म्हणाले. ते पोर्ट ब्लेअरमध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपला भारत देश कुठून कुठे पोहोचू शकला असता. आम्हा भारतीयांचं  सामर्थ्य कधीच कमी नव्हतं. मात्र, भ्रष्ट आणि घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर अन्यात केला आहे. मला अवधी भाषेतील एका कवीतेची ओळ आठवते, "गाइत कुछ है, हाल कुछ है, लेबिल कुछ है, माल कुछ है." 24 साठी 26 होणाऱ्या राजकीय पक्षांसाठी हे एकदम परफेक्ट बसते.

हे विरोधी पक्षांचे लोक दुकाने उघडून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. हे भारताची दुर्दशा करणारे लोक आपली दुकानं उघडून बसले आहेत. यांच्या दुकानावर 2 गोष्टींची गॅरंटी आहे. हे लोक आपल्या दुकानावर जातीयवादाचे विष विकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे, भ्रष्टाचार करतात. सगळेच भ्रष्टाचारी मोठ्या प्रेमाणे भेटत आहेत. मात्र यांच्या दुकानात जमा झालेले लोक घराणेशाहीचे समर्थक आहेत. खरे तर, न खाता, न बही, जो परिवार कहे वो सही," यावरच त्यांचा विश्वास आहे. हे लोक केवळ आपल्या मुलांचाच विचार करतात, असेही मोदी म्हणाले.

हे कट्टर भ्रष्टाचाऱ्यांचे सम्मेलन आहे, असे म्हणत, जामिनावर असलेल्या काही लोकांकडे मोठ्या आदराने पाहत आहेत. ज्यांचे संपूर्ण कुटुंब जामिनावर आहे, त्यांना अधिक सन्मान मिळत आहे.  हे लोक, गात एक आहेत, परिस्थिती वेगळीच आहे, यांनी लेबल काही वेगळेच लावले आहे आणि माल काही औरच आहे, असा निशाणाही मोदी यांनी साधला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण