शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा वाटलं होतं सगळं संपलं, विमान बिघाडावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच केले भाष्य   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:43 IST

निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना विमानात झालेल्या संशयास्पद बिघाडादरम्यान आलेला अनुभव राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडला. त्यावेळी ते म्हणाले...

नवी दिल्ली  -  दोन तीन दिवसांपूर्वी आम्ही कर्नाटकमध्ये जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला. मला वाटलं सगळं संपलं. पण तेवढ्यात मी कैलास मानसरोवर यात्रा करेन असा विचार मनात आला, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना विमानात झालेल्या संशयास्पद बिघाडादरम्यान आलेला अनुभव आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडला. काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेल्या जनआक्रोष मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. यावेळीच त्यांनी आपल्या विमानात संशयास्पदपणे झालेल्या बिघाडाचाही उल्लेख केला.  खरंतर राहुल गांधी आपले भाषण पूर्ण करून जागेवर बसले होते. मात्र काही वेळातच ते पुन्हा उभे राहिले. त्यावेळी ते म्हणाले, " तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात.  मला तुम्हाला एका गोष्ट सांगायची आहे. खरंतर ही गोष्ट सांगायची नव्हती, पण मग विचार केला तुम्ही आपलीच माणसं आहात. म्हणून सांगतो. तुम्हा माहीतच असेल दोन तीन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला होता. मला वाटलं सगळं संपलं. पण तेवढ्यात मी कैलास मानसरोवर यात्रा करेन असा विचार मनात आला. आता कर्नाटकचा निकाल 12 मे रोजी आहे. त्यानंतर पुढचे 10-15 दिवस तुम्ही मला सुट्टी द्या. म्हणजे मी कैलास आणि मानसरोवराची तीर्थ यात्रा करून येईन."  दरम्यान, आज झालेल्या जनआक्रोष सभेत  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. डोकलाम, शेतकऱ्यांचं कर्ज, भ्रष्टाचार, न्यायालयातील 4 न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद या मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधलं. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन न्याय मागावा लागतो. मात्र तरीही मोदी मूग मिळून गप्प बसतात, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.  राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका करत 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल फुंकलं. भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा, बँक घोटाळे, राफेल करार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी शांत का बसतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश रॅलीला ते संबोधित करत होते. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ही राहुल यांची दिल्लीतील पहिलीच रॅली होती. कर्नाटकची निवडणूक जवळ आली असताना राहुल गांधींनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'आतापासून येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस जिंकेल आणि 2019 मध्ये ताकद दाखवून देईल,' असं राहुल यांनी म्हटलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८