नेताजींबद्दल माहिती करून घेणे हा हक्कच -ममता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 00:48 IST2018-09-19T00:47:10+5:302018-09-19T00:48:48+5:30
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबाबत १९४५ मध्ये झालेल्या तैहोकू विमान अपघातानंतर काय घडले? यामागचे सत्य जाणून घेण्याचा लोकांना हक्कच आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सांगितले.

नेताजींबद्दल माहिती करून घेणे हा हक्कच -ममता
कोलकाता : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबाबत १९४५ मध्ये झालेल्या तैहोकू विमान अपघातानंतर काय घडले? यामागचे सत्य जाणून घेण्याचा लोकांना हक्कच आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सांगितले.
माझ्या सरकारने बरोबर वर्षापूर्वी म्हणजेच १८ सप्टेंबर, २०१५ रोजी नेताजींशी संबंधित कागदपत्रांच्या ६४ फायली खुल्या केल्या होत्या, असे त्या म्हणाल्या.मोदी सरकारनेदेखील जानेवारी २०१५ मध्ये नेताजी बोस यांच्याशी संबंधित अनेक फायली खुल्या केल्या होत्या. बोस यांच्याबाबत काय घडले? याचा पुरावा किंवा माहिती नाही. बोस यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्याशी संबंधित सगळ््या फायली खुल्या न केल्याबद्दल व राष्ट्रीय सुटी जाहीर न केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला फटकारले होते.