शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी बनणे शक्य नाही, सेवाजी बनावे : नरेंद्र मोदी; दिल्लीत शिवजयंती साजरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 07:43 IST

Narendra Modi : मोदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशात शतकांपासून प्रेरणास्रोत राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या संस्कारांप्रमाणे सरकारने राष्ट्र रक्षा आणि राष्ट्रवादाला प्राथमिकता दिली आहे.

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज बनणे शक्य नाही; परंतु, ‘सेवाजी’ बनू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अभिवादन केले. भारतमातेचे अमर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: प्रणाम. त्यांचे साहस, उत्तुंग शौर्य आणि असामान्य बुद्धिमत्ता यांची गाथा देशवासीयांना युगानुयुगे प्रेरणा देत राहील. जय शिवाजी! अशी भावना मोदींनी ट्वीवटरवरून व्यक्त केली.मोदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशात शतकांपासून प्रेरणास्रोत राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या संस्कारांप्रमाणे सरकारने राष्ट्र रक्षा आणि राष्ट्रवादाला प्राथमिकता दिली आहे. महाराजांनी राष्ट्र रक्षणाकरिता सशस्र सेनेला प्राधान्य दिले. त्याकाळात शिवाजी महाराजांनी नौसेनेची बांधणी केली. त्यामुळे सरकारने भारताच्या लष्कराला जगातील इतर शक्तिशाली लष्कराच्या श्रेणीत उभे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज होणे शक्य नाही. परंतु, सव्वाशे कोटी देशवासीय ‘सेवाजी’ बनू शकतात. आपण शिवाजी बनू शकलो नाही तरी ‘सेवाजी’ बनू शकतो. दररोज एक सेवेचे काम केले तरी शिवाजी महाराजांच्या स्वप्नांना सेवेच्या माध्यमातून संपन्न केले जाऊ शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र सदनात जल्लोष! छत्रपती संभाजी राजे यांनी नवीन महाराष्ट्र सदनात शिवाजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिल्लीतील असंख्य मराठी लोक यावेळी उपस्थित होते. जय शिवाजीच्या घोषणांनी सदनाचा परिसर दुमदुमला होता. 

ऑनलाइन व्याख्यान! महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त ‘शिवरायांचे संघटन कौशल्य’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक गणेश आष्टेकर यांनी विचार मांडले. शिवाजी महाराजांच्या गुणग्राहकतेतून व दूरदृष्टीतून स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांचे संघटन निर्माण झाले. भारतात श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने संघटन कौशल्याचे उत्तम आदर्श बघायला मिळतात. या दोन्ही महान व्यक्तीमत्त्वांनी संघटन कौशल्याच्या जोरावर आपल्या सवंगड्यांना एकत्र करून स्वराज्याची व अस्मितेची मोट बांधली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShivjayantiशिवजयंती