सियाचीनमधून सैन्य काढणं अशक्य - मनोहर पर्रिकर
By Admin | Updated: February 26, 2016 12:54 IST2016-02-26T12:52:21+5:302016-02-26T12:54:14+5:30
सियाचीन अत्यंत महत्वाची जागा असल्या कारणाने त्या जागेची सुरक्षा करणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असल्यांच केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितल आहे

सियाचीनमधून सैन्य काढणं अशक्य - मनोहर पर्रिकर
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २६ - सियाचीन अत्यंत महत्वाची जागा असल्या कारणाने त्या जागेची सुरक्षा करणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असल्यांच केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितल आहे. लोकसभेत बोलताना मनोहर पर्रिकर यांनी ही माहिती दिली आहे.
सियाचीनमधून आपण जर सैन्य काढून घेतले तर शत्रु त्याचा ताबा घेईल आणि त्यानंतर पुन्हा ती जागा मिळवणं खुप कठीण होईल. पुन्हा ती जागा मिळवण्यासाठी आपल्या खुप जणांच्या जीवाची किंमत मोजावी लागेल असंही मनोहर पर्रिकर बोलले आहेत. आपल्याला सियाचीनसाठी खुप मोठी किंमत मोजावी लागत आहे याची कल्पना आहे मात्र आपल्याला अशाचप्रकारे ताबा ठेवावा लागेल असं मनोहर पर्रिकरांनी स्पष्ट केलं आहे.