शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

डांबरी रस्त्यांत भंगार प्लॅस्टिक वापरणे सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2015 00:01 IST

रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी आणि त्याच बरोबर शहरांमध्ये तयार होणाऱ्या भंगार प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीस हातभार लागावा

नवी दिल्ली : रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी आणि त्याच बरोबर शहरांमध्ये तयार होणाऱ्या भंगार प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीस हातभार लागावा या दुहेरी उद्देशाने केंद्रीय रस्ते मंत्रालयाने यापुढे शहरांमध्ये डांबरी रस्ते बांधताना बिच्युमनसोबत प्लॅस्टिक भंगाराचाही वापर करणे सक्तीचे केले आहे.केंद्राच्या तसेतच राज्यांच्या योजनांतर्गत पाच लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या ५० किमी परिसरात डांबरी रस्ते बांधताना यापुढे भंगार प्लॅस्टिक वापरणे सक्तीचे असेल. पवडत नाही किंवा प्लॅस्टिकचे भंगार उपलब्ध नाही अशा कारणांवरून प्लॅस्टिक भंगाराचा वापर न करण्यासाठी मंत्रालयाची पूर्वसंमती घ्यावी लागेल, असे निर्देश रस्ते वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच जारी केले आहेत.हा नवा निर्णय सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनाही कळविण्यात आला असून राज्यांनीही आपल्या अखत्यारितील रस्ते बांधताना या धोरणाचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.यानुसार डांबरी रस्ते बांधताना बिच्युमनसोूत भंगार प्लॅस्टिक किती प्रमाणात वापरावे, हे यात म्हटलेले नाही. मात्र रस्त्यांविषयीचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या इंडियन रोड काँग्रेस या सर्वोच्च प्रातिनिधिक संस्थेने रस्त्यांच्या बांधकामात भंगार प्लॅस्टिकचा वापर कसा करावा याची मार्गदर्शिका दोन वर्षांपूर्वी जारी केली आहे, असे नमूद करून त्याचे पालन करावे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)