शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
4
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
5
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
6
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
7
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
8
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
9
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
10
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
11
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
12
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
13
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
14
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
15
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
16
'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
17
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
18
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
19
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
20
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेट न्यूट्रलिटीचा मुद्दा तापला, वाचा त्याचे तोटे

By admin | Updated: April 13, 2015 15:13 IST

सध्या सोशल मिडीयावर नेट न्यूट्रलिटीचा वाद चांगलाच तापला असून हा वाद नेमका काय, त्यातून होणारे तोटे याचा घेतलेला हा आढावा...

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १३ - सध्या भारतात नेट न्यूट्रलिटीचा मुद्दा चांगलाच तापत असून सिनेसृष्टीतील कलाकार, राजकारणी अशी दिग्गज मंडळी नेट न्यूट्रलिटीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सरसावल्या असून हा वाद नेमका काय आहे, यातून ग्राहकांचा होणारा तोटा याचा घेतलेला हा आढावा...
 
नेट न्यूट्रलिटी म्हणजे काय ?
स्मार्टफोन्सच्या वाढत्या वापरामुळे इंटरनेटचे वापर वाढत असून ग्राहकांसाठी दररोज नवीन अ‍ॅप्सची भर पडत आहे. हे सर्व अ‍ॅप्स सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता असते. तुम्ही इंटरनेट प्लॅन सुरु केला की कोणतेही अ‍ॅप वापरु शकता. नेटवरुन कोणतीही वेबसाईट बघू शकता. ईमेलही करु शकता. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी कोणताही भेदभाव न करता सर्व माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे याला नेट न्यूट्रलिटी म्हणतात. 
 
काय आहे कंपन्यांची नवी शक्कल ?
वॉट्स अ‍ॅप, स्कायपे, हाइक, वी चॅट यासारख्या अ‍ॅप्समुळे टेलिकॉम कंपन्यांची डोकेदुखी वाढवली आहे. या अ‍ॅप्समुळे एसएमएस कालबाह्य झाले असून आता व्हॉईस कॉलिंग सुविधाही सुरु झाल्याने टेलिकॉम कंपन्यांसमोर नवे आव्हान निर्माण झाला आहे. यासाठी कंपन्यांनी एक नवी शक्कल लढवली आहे. इंटरनेट सुविधा देणा-या इंटरनेटच्या वापरावर फिल्टर बसवण्याच्या प्रयत्नात आहेत. यानुसार अ‍ॅप्ससाठी विशेष प्लॅन दिला जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला वॉट्स अ‍ॅप, हाइकसाठी एक विशेष पॅकेज घ्यावे लागेल. तर यूट्यूबसारख्या साईट्सवर व्हिडीओ बघता यावा यासाठी तुम्हाला दुसरे पॅकेज निवडावे लागेल. तुम्हाला नेटवर सर्च करायचे असेल किंवा ईमेलची सुविधा हवी असेल तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागेल.  यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागेलच तसेच नेट न्यूट्रलिटीही धोक्यात येईल.
दुसरी महत्त्वाची म्हणजे कंपनी त्यांच्या फायद्यापोटी प्रत्येक अ‍ॅप किंवा वेबसाईटसाठी तेवढीच स्पीड उपलब्ध करुन देतील का हा प्रश्नच आहे. उदाहरणार्थ तुम्हाला अ‍ॅमेझोन या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर जायचे आहे. पण इंटरनेट सर्व्हिस देणारी कंपनी त्या पोर्टलवर जाण्यासाठी अत्यंत कमी स्पीड देऊ शकेल. तर फ्लिपकार्टवर मात्र चांगली स्पीड दिली जाईल. यामुळे तुम्ही कंटाळून अ‍ॅमेझोनसोडून फ्लिपकार्टवरुनच खरेदी कराल. 
 
भारत व नेट न्यूट्रलिटी 
नेट न्यूट्रलिटी हा मुद्दा जगभरात नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. पण आता याची झळ भारतातही बसण्याची चिन्हे आहेत. यासाठी निमित्त ठरले ते एअरटेलचे झिरो प्लॅन. या प्लॅनमध्ये काही ठराविक अ‍ॅप्ससाठी शून्य दर आकारणी केली जाईल. एअरटेलने या प्लॅनमध्ये फ्लिपकार्टच्या अ‍ॅपचाही समावेश केल्याने वाद निर्माण झाला. यावरुन  सोशल मिडीयावर फ्लिपकार्टवर टीकेची झोड उठली. रिलायन्स व फेसबुकने सुरु केलेली internet.org ही सुविधाही काहीशी वादग्रस्त ठरली. यात फेसबुक व अन्य काही अ‍ॅप्स इंटरनेटशिवाय वापरणे शक्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः टेक्नोसेव्ही नेते असून इंटरनेटचे महत्त्व ते जाणून आहेत. लघु उद्योजकांना इंटरनेटच्या माध्यमातून बाजारपेठ मिळू शकते. पण जर इंटरनेट वापरावर फिल्टर लावले गेले तर डिजीटल क्रांतीचे मोदींचे स्वप्न प्रत्यक्षात येणे कठीण आहे असे जाणकार सांगतात. 
 
जनजागृती करणारा एआयबीचा व्हिडीओ
अश्लील संवादांचा भडीमार असलेल्या शोमुळे वादग्रस्त ठरलेल्या एआयबीने टेलिकॉम कंपन्यांच्या या चलाखीविरोधात एक व्हिडीओ जाहीर केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच गाजत असून बॉलिवूडमधील शाहरुख खानसारख्या दिग्गज अभिनेत्यानेही हा व्हिडीओ शेअर करत नेट न्यूट्रलिटीचे समर्थन केले आहे.  या व्हिडीओत सहज सोप्या शब्दात नेट न्यूट्रलिटीचा तोटे, त्याला विरोध का करावा हे सर्व सांगण्यात आले आहे. 
 
तुमच मत महत्त्वाचे 
इंटरनेट वापरावर फिल्टर लावले नाही तर नुकसान होईल असा कांगावा करत टेलिकॉम कंपन्यांनी ट्रायकडे धाव घेतली. आता ट्रायने या संदर्भात ग्राहक व टेलिकॉम कंपन्या या दोघांचेही मत मागवले आहे. आत्तापर्यंत सुमारे तीन लाख लोकांनी ट्रायला ईमेल पाठवून टेलिकॉम कंपन्यांच्या या प्रयत्नांचा निषेध दर्शवला आहे. तुम्हीही ww.trai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुमचे मतं नोंदवू शकता. संकेतस्थळावर ओव्हर द टॉप (OTT) संबंधीत लिंकवर तुम्हाला तुमचे मत मांडता येईल. २४ एप्रिलपर्यंत