वर्सोव्यात विकासाचा मुद्दा हाच अजेंडा
By Admin | Updated: October 7, 2014 02:16 IST2014-10-07T02:16:55+5:302014-10-07T02:16:55+5:30
वर्सोवा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बलदेव खोसा यांच्याविरुद्ध उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नरेंद्र वर्मा सर्वांगीण विकासासाठी साथ

वर्सोव्यात विकासाचा मुद्दा हाच अजेंडा
मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बलदेव खोसा यांच्याविरुद्ध उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नरेंद्र वर्मा सर्वांगीण विकासासाठी साथ द्या, असे आवाहन वर्मा मतदारांना करीत असून त्यांना पाठींबा मिळत आहे.
वर्सोव्यात शिवसेनेचा उमेदवार नसल्याने त्याचा फायदा वर्मा यांना होऊ शकतो. मराठी मते खेचण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. शिवाय मनसेचे मनीष धुरी आणि भाजपाच्या डॉ. भारती लव्हेकर आणि समाजवादी पार्टीचे एस. एम. खान हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नरेंद्र वर्मा यांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून यारी रोड, वर्सोवा गांव, सात बंगला, सरदार पटेलनगर, शास्त्रीनगर, स्वामी समर्थनगर, लोखंडवाला, मिल्लतनगर, यादवनगर, बेहराम बाग, वैशालीनगर या भागांत त्यांनी बाईक रॅली काढली. सात बंगला पिंक अपार्टमेंटमधील त्यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव मधुसूदन सदडेकर, अजय यादव, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहंमद कोठडीया, पक्षाचे वर्सोवा तालुका अध्यक्ष प्रदीप टपके, युवक अध्यक्ष अज्ञान, पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गनी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)