शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

'जीसॅट 7 ए' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 4:31 PM

भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट ' GSAT-7A' चे बुधवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 

श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट 'जीसॅट 7 ए'चे बुधवारी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले. 

'जीसॅट 7 ए' सॅटलाइट जीएसएलव्ही- एफ 11 या रॉकेटमधून संध्याकाळी 4.10 वाजता श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. 'जीसॅट 7 ए' हे सॅटलाइट हवाई दलासाठी फायदेशीर आहे. GSAT-7A या उपग्रहामुळे हवाई दलाच्या लढण्याच्या क्षमतेत कैकपटीने वाढ होणार आहे. 

2250 किलोच्या 'जीसॅट 7 ए' च्या रूपाने हवाई दलाच्या ताफ्यात अखंड संपर्क देणारा उपग्रह दाखल होणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय कारवायांमध्ये लढाऊ विमाने आणि ग्राउंड स्टेशन सतत संपर्कात राहू शकतील. याशिवाय,  'जीसॅट 7 ए' हे फक्त हवाई दलाच्या एअरबेसशीची इंटरलिंक होणार नाही, तर ड्रोन ऑपरेशनमध्येही या उपग्रहाची मदत होणार आहे.

'जीसॅट 7 ए' या उपग्रहाच्या माध्यमातून ड्रोनवर आधारित असलेल्या मोहिमांमध्ये हवाई दलाला मोठी मदत मिळणार आहे. त्यात भारत अमेरिकेकडून प्रिडेटर-बी, सी गार्डियन ड्रोन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या ड्रोनला उपग्रहाच्या माध्यमातून नियंत्रित करून शत्रूंवर हल्ला करता येणार आहे. या उपग्रहाचा खर्च जवळपास 500 ते 800 कोटींच्या घरात आहे.'जीसॅट 7 ए'  या उपग्रहामध्ये 4 सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. जे जवळपास 3.3 किलोवॉट वीजनिर्मितीत करणार आहेत. तसेच या उपग्रहात अवकाशातील कक्षांमध्ये वर-खाली स्थिरावण्यासाठी केमिकल प्रोपल्शन सिस्टीमही देण्यात आले आहे. तत्पूर्वी इस्रोनेGsat-7 या रुक्मिणी नावाचे सॅटलाइटही लाँच केले होते. या सॅटलाइटचे लाँचिंग 29 सप्टेंबर 2013मध्ये करण्यात आले होते. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्याचा या उपग्रहाचा उद्देश होता. या उपग्रहाच्या माध्यमातून युद्धनौका, पाणबुड्या आणि वायुसेनेच्या संचाराची सुविधा पुरवण्यात आली होती.  

 

टॅग्स :isroइस्रो