Chandrayaan-2 : 'प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 06:15 PM2019-09-06T18:15:43+5:302019-09-06T18:16:21+5:30

चांद्रयानाचे लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या केंद्रात उपस्थित राहणार आहेत.

ISRO chief K Sivan says things going as per plan for Chandrayaan-2’s soft moon landing | Chandrayaan-2 : 'प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार'

Chandrayaan-2 : 'प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार'

Next

नवी दिल्ली : भारतीयांसाठी आजची मध्यरात्र ऐतिहासिक असणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोने पाठवलेले 'चांद्रयान-2' आज मध्यरात्री १.३० ते २.३०च्या सुमारास चंद्रावर लँड होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी देशवासीय उत्सुक आहेत. 

चांद्रयानाचे लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या केंद्रात उपस्थित राहणार आहेत. आम्ही चांद्रयानाचे लँडिंग अशा ठिकाणी उतरवत आहेत. ज्याठिकाणी याआधी कोणीही गेले नाही. आम्हाला सॉफ्ट लँडिंगबाबत विश्वास असून रात्रीची वाट पाहत आहोत, असे इस्त्रोचे प्रमुख के. सीवन यांनी शुक्रवारी सांगितले. 

चांद्रयान-2 चे विक्रम लँडर जर सॉफ्ट लँडिंगमध्ये यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीन नंतर भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश असणार आहे. तसेच, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश असणार आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चे लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत. त्याआधी त्यांनी काही ट्विट करून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत, अभिनंदन केलं आहे. चांद्रयान-2 चे लँडिंग अधिकाधिक देशवासीयांनी पाहावे, या हेतूने मोदींनी जनतेला एक ऑफर दिली आहे. हे लँडिंग पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यास मोदी तो रिट्विट करणार आहेत. '१३० कोटी देशवासीय ज्या क्षणाची वाट बघत आहेत, तो काही तासांवर आला आहे. देश आणि जग पुन्हा एकदा आमच्या शास्त्रज्ञांची शक्ती पाहील', असे मोदींनी म्हटले आहे.


चंद्र कसा बनला आहे? चंद्रात कलाकलाने बदल का-कसा होतो? चंद्रावर पाणी आहे, असलं तर किती आहे? या आणि अशा अनेक रहस्यांचा उलगडा चांद्रयान-2 मुळे होणार आहे. विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडणार आहे. हा रोव्हर पुढची दोन वर्षं चंद्रावरील छायाचित्र इस्रोला पाठवेल. आत्तापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाला आहे. आज हा मानाचा तुरा भारताच्या, इस्रोच्या शिरपेचात खोवला जाईल. 

तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार 
- इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल. 
- प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल. 
- दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल.
 

Web Title: ISRO chief K Sivan says things going as per plan for Chandrayaan-2’s soft moon landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.