मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 08:48 AM2024-05-01T08:48:19+5:302024-05-01T08:50:16+5:30

कपड्यात डोकावण्यापेक्षा लोकांचे दुःख पाहा

The Chief Minister is looking only at women's clothes, why? Rabidevi criticized on Nitish Kumar | मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार

मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार

पाटणा : पूर्वी कोणी कपडे घालून चालायचे, आता बघा किती छान दिसतात. चुकून जरी या लोकांना मत दिले, तर तुम्ही बरबाद व्हाल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच एका निवडणूक रॅलीत महिलांकडे बोट दाखवत म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिलांच्या कपड्यांकडे बघत राहतात, त्यांना महिलांच्या विषयामध्ये इतके कुतूहल का, अशी टीका करत माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, नितीश कुमार यांनी कुणाच्या कपड्यात डोकावण्यापेक्षा बिहारच्या लोकांचे दुःख, त्रास आणि समस्या पाहिल्या असत्या, तर बरे झाले असते.

पदाचे तरी भान ठेवा...

नितीश हे महिलांना अपमानीत करत आहेत. तुम्ही अतिशय जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर आहात याचे भान ठेवा, असे राबडीदेवींनी म्हटले आहे.

इतके कुतूहल?

घर असो, रस्ता असो, की निवडणुकीचे व्यासपीठ, मुख्यमंत्री, सर्व कामे सोडून महिला काय करतात? ती ओढणी घेते का? मुलांना जन्म देतात का? यावर लक्ष ठेवतात. त्यांना महिलांच्या विषयांमध्ये इतके कुतूहल का आहे?

अस्मितेला धक्का लावू नका

तुम्हाला तुम्हाला राजकीय रा विरोध करायचा असेल, तर आणि वस्तुस्थितीने करा, तुमच्या संकुचित तर्क विचारसरणीने आणि जिभेने महिलांच्या अस्मितेला धक्का लावू नका, असे राबडीदेवी यांनी म्हटले आहे. राबडीदेवी यांनी ४२ सेकंदांचा व्हिडीओही शेअर केला आहे. • यात मुख्यमंत्री मंचावर उपस्थित महिला नेत्याकडे पाहून म्हणतात की, पूर्वी काहीतरी मिळायचे, काहीतरी व्यवस्थित परिधान करायच्या. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील काही अंश आहे. यात ते नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आहेत.

Web Title: The Chief Minister is looking only at women's clothes, why? Rabidevi criticized on Nitish Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.