शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत दौरा; राष्ट्रपती भवनात दिलं 'गार्ड ऑफ ऑनर', नेतन्याहू म्हणाले मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 11:29 IST

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली-  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. रविवारी नेतन्याहू नवी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनात त्या गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. भारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे, अशी भावना यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्यानंतर मी भारताचा दौरा केला. माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी इस्रायलच्या नागरिकांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही देशांमध्ये समृद्धी, शांती आणि  प्रगतीसाठी मिळून काम करूया, असं यावेळी नेतन्याहू यांनी म्हंटलं. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नेतन्याहू व त्यांच्या पत्नीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. 

 

भारत व इस्रायल या दोन्ही देशांच्या मैत्रीची जोडी स्वर्गात बनली आहे. असं असताना संयुक्त राष्ट्रात दिलेलं एक मत नातं नाही बदलू शकत. जेरूसलेमच्या मुद्द्यावर भारताने युएनमध्ये इस्रायल विरोधात मत दिलं होतं. यामुळे निराशा झाली पण ते एक मत दोन्ही देशामधील नात्यात दूरावा आणू शकत नाही, असंही ते पुढे म्हणाले. 

 

राजशिष्टाचार बाजूला सारून मोदींनी विमानतळावर केलं नेतन्याहूंचे स्वागतइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौ-यासाठी भारतात दाखल झाले असून, राजशिष्टाचाराचे संकेत सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी विमानतळावर त्यांची गळाभेट घेऊन जोरदार स्वागत केलं. इस्रायलचे पंतप्रधान १५ वर्षांनी भारतात आले आहेत. नेतन्याहू यांच्यासोबत पत्नी सारा आल्या आहेत. मोदी यांनी इंग्रजी आणि हिब्रू भाषेत ट्विट  केले की, माझे मित्र नेतन्याहू भारतात स्वागत आहे. भारतातील दौरा ऐतिहासिक आणि विशेष आहे. यातून दोन्ही देशातील मैत्री आणखी मजबूत होईल.

यंदाचे वर्ष हे भारत व इस्रायल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याचे २५ वे वर्षे आहे. नेतन्याहू यांच्यासोबत आजवर कधीही नव्हते एवढे मोठे व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. या भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, संरक्षण, दहशतवाद नियंत्रण, अशा विविध क्षेत्रांत अनेक करार अपेक्षित आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलIndiaभारतNew Delhiनवी दिल्ली