शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

हमासवर बंदी घालण्यास भारताचा नकार, अब्जो डॉलर्सच्या व्यापारावर होऊ शकतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 18:22 IST

अमेरिका-जर्मनीने हमासवर बंदी घातली आहे, शिवाय अनेक देश हमासच्या विरोधात आहेत.

Israel VS Hamas: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगभरात दोन गट पडले आहेत. एक गट इस्रायलचे समर्थन करत आहे, तर दुसरा गट पॅलेस्टानचे समर्थन करत आहे. जगभरातून हमासवर कारवाईची मागणीही होत आहे. अमेरिका आणि जर्मनी हमासला दहशतवादी संघटना मानतात आणि दोन्ही देशांनी त्यावर बंदी घातली आहे.

भारतानेही हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी केली होती. पण, भारताने हमासवर अद्याप बंदी घालणार नसल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या हमास भारतात सक्रिय नाही, त्यामुळे त्यावर बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ग्रहमंत्रालयाचे म्हणने आहे. सरकारने असे केल्यास अरब देशांशी भारताचे संबंध बिघडू शकतात, अशीही भीती सरकारला आहे. त्यामुळे सध्या या संघटनेवर भारतात बंदी घातली गेली नाही. 

कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय यूएपीए कायद्यानुसार गृह मंत्रालय घेते. फेब्रुवारी 2023 पर्यंत UAPA यादीमध्ये 44 संघटनांचा समावेश होता, ज्यांना भारत दहशतवादी संघटना मानतो. भारताने 2015 मध्ये ISIS ला दहशतवादी संघटना घोषित केले होते. या यादीत एखाद्या संस्थेचा समावेश करणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. भविष्यात भारत हमासबाबत निर्णय घेईल, अशी शक्यता आहे, परंतु सध्या तसा निर्णय घेतलेला नाही. 

इस्रायलवर भारताची अधिकृत प्रतिक्रिया7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर संघटनेवर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. संकटकाळात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे, असे पीएम मोदी म्हणाले होते. या संपूर्ण वक्तव्यात त्यांनी हमासचा कुठेही उल्लेख केला नाही. याशिवाय, 14 ऑक्टोबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाने हमास हल्ल्याचे वर्णन दहशतवादी हल्ला, असे केले. मात्र, हमासवर त्यांनी काहीही न बोलता पॅलेस्टाईन वेगळा देश असावा, या भारताच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

भारत अरब देशांशी संबंध बिघडवू इच्छित नाहीमध्यपूर्वेतील 22 देशांपैकी (अरब देश), सौदी अरेबिया, UAE आणि इराक हे भारताचे प्रमुख तेल पुरवठादार आहेत. भारताने 2020-21 मध्ये गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) (ज्यात कुवेत, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान आणि UAE समाविष्ट आहे) सोबत 90 अब्ज डॉलरचा व्यापार केला. याशिवाय भारताला परकीय चलनाचा मोठा हिस्सा येथून मिळतो.

आखाती देशांसोबत व्यापारी संबधकोरोनाच्या कालावधीपूर्वी 2019-20 मध्ये आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी देशात 6.38 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवली होती. यातील 53% फक्त 5 आखाती देश - UAE, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि ओमानमधून भारतात आला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, सौदी अरेबिया आणि कतार हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. एवढेच नाही तर UAE हे भारतासाठी अमेरिकेनंतरचे दुसरे सर्वात मोठे व्यापारी ठिकाण आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारतIsraelइस्रायलwarयुद्धbusinessव्यवसाय