शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ISIS कनेक्शन? NIAकडून गँगस्टर 'हाफिज'ला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 17:25 IST

आयसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेचा राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठा कट उधळला आहे.

नवी दिल्ली : आयसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेचा राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठा कट उधळला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील एकूण 17 ठिकाणांवर छापेमारी करत आयसिसच्या नवीन मॉड्युल 'हरकत उल हर्ब ए इस्लाम' या संघटनेचा पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये सोहेल उर्फ हाफिज नावाच्या एका युवकाचा समावेश आहे. हाफिज या मॉड्युलचा कथित गँगस्टर असल्याचे सांगण्यात येत आहे.  राष्ट्रीय तपास संस्थेच्या माहितीनुसार, 'हरकत उल हर्ब ए इस्लाम' संघटनेशी निगडीत सर्व सदस्य सोशल मीडियाच्या माध्यातून संपर्कात आले होते.

अमरोहा येथून अटक करण्यात आलेल्या हाफिजच्या वडिलांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे चार वाजताच्या सुमारास साध्या वेशात जवळपास सहा लोक त्यांच्या घरी आले. त्यानंतर घराची झडती घेतली. मात्र, याठिकाणी त्यांना काही मिळाले नाही. 

दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्था, दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश एटीएस यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईदरम्यान बुधवारी एकूण 17 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून 5 संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशातील अमरोहा, दिल्लीतील जाफराबाद येथील ठिकाणांवर छापा मारण्यात आला. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCrime Newsगुन्हेगारी