श्रीनगरमध्ये पुन्हा फडकले इसिस व पाकिस्तानचे झेंडे
By Admin | Updated: April 8, 2016 16:09 IST2016-04-08T16:09:15+5:302016-04-08T16:09:15+5:30
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पुन्हा काही आंदोलकांकडून पाकिस्तान आणि इसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकविण्यात आले.

श्रीनगरमध्ये पुन्हा फडकले इसिस व पाकिस्तानचे झेंडे
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ८ - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पुन्हा काही आंदोलकांकडून पाकिस्तान आणि इसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकविण्यात आले.
श्रीनगरच्या ऐतिहासिक जामिया मशिदीजवळ आज ही घटना घडली. यावेळी आंदोलकांकडून पाकिस्तान आणि इसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकविण्यात आले. तसेच, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचेही सांगण्यात येते.
दरम्यान, याआधीही जामिया मशिदीजवळच जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या मोर्च्यात काही आंदोलकांनी पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले होते. त्यामुऴे या परिसरात तणाव निर्माण झाला होता.