शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

इशरत जहाँ चकमक; तीन पोलीस अधिकारी निर्दोष, विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:15 IST

Ishrat Jahan Encounter : वर्ष २००४ मध्ये झालेल्या इशरत जहाँ कथित बनावट चकमक खटल्यात येथील विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाने बुधवारी पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल, तरुण बारोट आणि अनाजू चौधरी यांना बुधवारी निर्दोष मुक्त केले.

अहमदाबाद : वर्ष २००४ मध्ये झालेल्या इशरत जहाँ कथित बनावट चकमक खटल्यात येथील विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाने बुधवारी पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल, तरुण बारोट आणि अनाजू चौधरी यांना बुधवारी निर्दोष मुक्त केले. न्यायाधीश व्ही. आर. रावल यांनी सिंघल, बारोट (आता निवृत्त) आणि चौधरी यांची निर्दोष मुक्त करा, अशी मागणी केलेले अर्ज मंजूर केले. सीबीआयने मंजुरी आदेशाविरोधात ( सिंघल, बारोट आणि चौधरी यांच्यावर खटले चालवण्यास गुजरात सरकारने परवानगी नाकारली होती) निश्चित असा काहीही उल्लेख केला नाही त्यामुळे दिसते हे की, अर्जदार किंवा आरोपी हे त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावत होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. सीबीआयने २० मार्च रोजी न्यायालयाला राज्य सरकारने या तीन आरोपींवर खटले चालवण्यास परवानगी नाकारली आहे, असे कळवले होते. न्यायालयाने ऑक्टोबर २०२० मधील आपल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले होते की, अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले. त्यामुळे चौकशी करणाऱ्या यंत्रणेला त्यांच्यावरील खटल्यांसाठी परवानगी आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावताना जे काही केले असेल त्यासाठी त्याच्यावर खटला चालवायचा असल्यास भारतीय दंड संहितेचे कलम १९७ अनुसार सरकारची मंजुरी लागते. इशरत जहाँ (१९) ही मुंबई जवळच्या मुंब्रा येथील तरुणी जावेद शेख ऊर्फ प्राणेश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा आणि झिशान जोहर यांच्यासोबत गुजरात पोलिसांशी १५  जून, २००४ रोजी अहमदाबादजवळ झालेल्या चकमकीत मारली गेली होती. मारले गेलेले चारही जण हे दहशतवादी होते व ते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची योजना तयार करत होते, असा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. तथापि, उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ती चकमक बनावट होती, असा निष्कर्ष काढल्यानंतर सीबीआयने वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. 

टॅग्स :Courtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागIndiaभारतPoliceपोलिस