तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 08:29 IST2025-04-22T08:27:39+5:302025-04-22T08:29:08+5:30

बाजारात आधीच चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या बनावट नोटांबाबत गृह मंत्रालयाने 'हाय अलर्ट' जारी केला आहे.

Is the Rs 500 note you have real or fake? Home Ministry warns | तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला

तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला

सध्या बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटा आल्या आहेत. याबाबत आता गृहमंत्रालयाने एक महत्वाची माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने बाजारात आधीच चलनात असलेल्या नवीन बनावट ५०० रुपयांच्या नोटांबाबत 'हाय अलर्ट' जारी केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालय वित्तीय गुप्तचर युनिट, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), राष्ट्रीय तपास संस्था (NIA), भारतीय सिक्युरिटीज आणि विनिमय मंडळ आणि इतर प्रमुख वित्तीय आणि नियामक संस्थांना हा इशारा दिला आहे.

अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण

या बनावट नोटा आणि खऱ्या नोटांमधील साम्य याबद्दल देखील ते इशारा दिला आहे. बनावट नोटांबाबतचे सुरक्षा परिपत्रक सेबी, डीआरआय, सीबीआय आणि एनआयएसह अनेक एजन्सींसोबत शेअर करण्यात आले आहे. बनावट नोटा छापण्याच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत मूळ नोटांसारख्याच आहेत. यामुळे एजन्सींना बनावट नोटा ओळखणे कठीण होते, असं मत गृहमंत्रालयाचे आहे. 

५०० रुपयांची बनावट नोट कशी ओळखायची?

५०० रुपयांच्या बनावट नोटा खऱ्या नोटांसारख्या दिसतात, त्यामुळे सामान्य माणसाला त्या ओळखणे कठीण जाते. ज्यावेळी आपण कोणताही व्यवहार खूप लवकर करत असतो आणि नोटांकडे जास्त पाहत नाही, त्यावेळी ही फसवणूक होऊ शकते. नोटांमध्ये एक दोष आहे, तो ओळखला तर तुम्ही बनावट नोटा लगेच ओळखू शकता. अहवालात म्हटले आहे की, शाईचा रंग आणि अक्षरांच्या आकाराच्या बाबतीत बनावट नोटा मूळ चलनाशी अगदी मिळत्याजुळत्या आहेत. फरक एवढाच आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्पेलिंगमध्ये E ऐवजी A आहे. सर्व बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ५०० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रसाराबाबत उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. भारतात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आधीच बाजारात आल्या आहेत, असंही यात म्हटले आहे.

Web Title: Is the Rs 500 note you have real or fake? Home Ministry warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.