शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ड्राय आईस एवढा खतरनाक? नेमका प्रकार काय? खाताच तोंडातून रक्त कसे आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 10:08 IST

कार्बन डाय ऑक्साईड गॅस एवढा धोकादायक नसतो. परंतु त्यापासून बनविलेला हा आईस खूप धोकादायक असतो.

गुरुग्रामच्या एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस खायला दिल्याने पाच जणांना तोंडातून रक्त वाहू लागले होते. यापैकी चार जण आयसीयूमध्ये दाखल आहेत. याचे पॅकेट या ग्राहकांनी डॉक्टरांना दाखविले तेव्हा ते माऊथ फ्रेशनर नसून ड्राय आईस असल्याचे समजले. यामुळे मृत्यूही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगताच या अत्यवस्थ ग्राहकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. 

हा ड्राय आईस म्हणजे नेमका काय प्रकार आहे? हे कार्बन डायऑक्साइडचे घनरूप आहे. ड्राय आईसला कुलिंग एजंट म्हणून वापरले जाते. याचा वापर वैद्यकीय ते अन्न उद्योगापर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. परंतु ते वापरण्याचे काही नियम आहेत. हा बर्फ पाण्यापासून बनलेला नसल्याने तो कोरडा असतो. उपयुक्त असला तरी तो अति धोकादायक असतो. 

सामान्य घरगुती बर्फाचे तापमान उणे 2-3 अंश सेल्सिअस असते. परंतु ड्राय आईसचे तापमान उणे ८० अंशापर्यंत असते. पाण्याचा बर्फ वितळू लागतो तर ड्राय आईस जेव्हा वितळू लागतो तेव्हा धूर निघतो. 

पांढरा धूर निघत असल्याने याचा वापर फोटोशूट आणि थिएटरमध्येही केला जातो. तुम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांमध्ये हा धूर पाहिला असेल, तो याच बर्फाचा असतो. गरम पाण्यात टाकल्यावर या बर्फातून धूर निघू लागतो. यामुळे धुके, ढगासारखे परिणाम दिसतात. 

हा बर्फ कसा बनविला जातो...प्रथम कार्बन डायऑक्साइड 109 डिग्री फॅरेनहाइटवर थंड केला जातो, नंतर दाब दिला जातो. यामुळे हा वायू घनस्वरुपात बनतो व त्याचे छोटे-मोठे तुकडे केले जाऊ शकतात.

संपर्कात आल्यावर काय होते...कार्बन डाय ऑक्साईड गॅस एवढा धोकादायक नसतो. परंतु त्यापासून बनविलेला हा आईस खूप धोकादायक असतो. कारण तो खूपच थंड असतो. यामुळे शरीरातील पेशी मरू लागतात. यामुळे या बर्फाला थेट स्पर्श करण्यास मनाई असते. ग्लोव्हज घालून हा बर्फ हाताळला जातो. तसेच एअर टाईट बॉक्समध्ये तो ठेवू नये. 

टॅग्स :Healthआरोग्य