शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या शाळेत ‘इरीस’ शिकविणार; वर्गात आली एआय टीचर; देशात पहिलाच प्रयाेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 07:53 IST

तिरुवनंतपुरम येथील केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेने मेकर्सलॅब एज्युटेक कंपनीच्या सहकार्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘इरीस’ची निर्मिती केली. इंटेल प्रोसेसर आणि डेडिकेटेड कॉम्प्रेसरमुळे शिक्षणाचा आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

तिरुवनंतपुरम : साक्षरतेत आघाडीवर असलेल्या केरळमध्ये शिक्षण क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग केले जातात. अशातच तिरुवनंतपुरम येथील एका शाळेने चक्क एआय शिक्षिकेची निर्मिती केली आहे. ‘इरीस’ असे या देशातील पहिल्या एआय शिक्षिकेचे नाव आहे. तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्यानव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

तिरुवनंतपुरम येथील केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेने मेकर्सलॅब एज्युटेक कंपनीच्या सहकार्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘इरीस’ची निर्मिती केली. इंटेल प्रोसेसर आणि डेडिकेटेड कॉम्प्रेसरमुळे शिक्षणाचा आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. नीती आयोगाच्या २०२१ मध्ये सुरू केलेल्या ‘अटल टिंगरिंग लॅब’ (एटीएल) अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला. नुकतेच ‘इरीस’चे सादरीकरण करण्यात आले. 

काय आहेत वैशिष्ट्ये?- तीन वेगवेगळ्या भाषेत शिकविते; तसेच किचकट प्रश्नांचेही सहजतेने उत्तर दिले जाते.- व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने संवादात्मक शिक्षणावर भर; नवतंत्रज्ञान आणि एआयबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. 

विद्यार्थ्यांशी संवादव्हॉइस असिस्टंट आणि जनरेटिव्ह एआयच्या मदतीने ‘इरीस’ विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देते. तसेच त्यांच्या शंकाचे निरसनही करते. विशेष म्हणजे ती वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवादही साधते.

पत्रकाराचा रोबोटने केला विनयभंगसौदी अरेबियाच्या एआय रोबोटने उद्घाटनाच्या दिवशीच एका महिला पत्रकाराचा विनयभंग केला. त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. सौदी अरेबियाने पहिल्या रोबोटची निर्मिती केली. रोबोटबाबत माहिती देताना रोबोटने तिला नको तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रसंगावधान राखत सावरले.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सKeralaकेरळTeacherशिक्षकSchoolशाळा