शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

Iran Israel war: अमेरिकी युद्धनौका, विमाने इराणच्या दिशेने, हल्ला करण्यासाठी पूर्वतयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 05:31 IST

इराणवर अमेरिकेने हवाई हल्ले करायचे ठरविल्यास त्यावेळी इंधन भरणारी विमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

वॉशिंग्टन : इराणविरुद्धच्यायुद्धातइस्रायलला मदत करण्यासाठी अमेरिकेची युद्धनौका पश्चिम आशियाच्या दिशेने वळविण्यात आली असून, विमानांत हवेत इंधन भरू शकणारी विमाने अमेरिकी तळांवरून युरोपच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येते. (Iran Israel war news)

इराणवर अमेरिकेने हवाई हल्ले करायचे ठरविल्यास त्यावेळी इंधन भरणारी विमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेची चाललेली पूर्वतयारी, असे या हालचालींकडे पाहिले जात आहे.

इराणमधून ८२७ भारतीय मायदेशी परतले

भारताने 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ८२७ जणांना सुरक्षितरीत्या मायदेशी परत आणले आहे. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शनिवारी दिली.

जर्मन सायकलपटूला अटक 

इराणने एका जर्मन सायकलपटूला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्याची कबुली शनिवारी प्रथमच दिली. जर्मनीवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

इराणचे तीन अधिकारी ठार

तेल अवीव : इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. इराणच्या अणुसंशोधन केंद्रावर हल्ला केला असून, त्यात त्या देशाचे तीन वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने शनिवारी केला. 

इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद पाडण्यासाठी गेल्या काही दिवसांत इस्रायलने हे हल्ले केले. इस्फहान भागात शनिवारी केलेल्या हल्ल्यात तेथील अणुसंशोधन केंद्राचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाwarयुद्ध