इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याविरुद्ध माजी लष्करी अधिकारी मेजर गौरव आर्य यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारत आणि इराणमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आर्य यांनी अरकाची यांना "सुअर की औलाद" म्हटले आहे. यानंतर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया समोर आली. भारतापूर्वी अराक्ची यांनी पाकिस्तानला भेट देत दिली. यावरुन नाराजी व्यक्त करताना मेजर आर्य यांनी ही टिप्पणी केली होती.
२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी अराक्ची यांच्या भेटीचे उद्दिष्ट असल्याचे वृत्त आहे.
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भारतातील इराणी दूतावासाने एक निवेदन जारी केले. त्यांनी लिहिले, "पाहुण्यांचा आदर करणे ही इराणी संस्कृतीत एक जुनी परंपरा आहे. आम्ही इराणी लोक आमच्या पाहुण्यांना 'देवाचे प्रिय' मानतो.
या घटनेनंतर भारत सरकारनेही तातडीने प्रतिक्रिया दिली. तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती भारतीय नागरिक आहे. त्यांचे विचार भारत सरकारच्या अधिकृत मताचे प्रतिनिधित्व करत नाहीत. भारत सरकार अशा अपशब्दांना अयोग्य मानते."
मेजर गौरव आर्य हे भारतीय माध्यमांमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या एक्स अकाउंटवर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या "चाणक्य डायलॉग्स" या युट्यूब शोचे ४० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.