अमेरिका आणि इस्राइलने सुरू केलेल्या युद्धानंतर इराणने होर्मुझच्या आखाताची नाकेबंदी केल्याने जगभरात इंधन संकट निर्माण झाले आहे. त्यात भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणमधूनभारतासाठी मोठी दिलासादायक बातमी आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलपीजीने भरलेली दोन जहाजे नेण्यास इराणे भारताला परवानगी दिली आहे.
इराणचे भारतामधील राजदूत मोहम्मद फथाली यांनी भारताला होर्मुझच्या आखातामधून तेलाची वाहतूक करण्यासाठी सुरक्षित वाट दिली जाईल, असे संकेत दिले होते. त्यानंतर काही तासांमध्येच इराणने एलपीजीने भरलेली दोन जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणण्यास इराणने मान्यता दिली आहे.
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारतात येत असलेल्या एलपीजीने भरलेल्या दोन जहाजांना या मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. एलपीजीने भरलेल्या दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी देण्यास इराण राजी झाला असल्याचं रॉयटर्सनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, इराण युद्धामुळे आखातामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीचा स्वयंपाकाचा गॅस देशात पुरेशा प्रमाणावर असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.
Web Summary : Amidst fuel concerns, Iran allows two LPG-laden ships passage through Hormuz Strait to India. This follows signals of safe passage for oil shipments, easing India's LPG shortage concerns. Government assures sufficient domestic gas supply.
Web Summary : ईंधन संकट के बीच, ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य से भारत के लिए दो एलपीजी जहाजों को मार्ग की अनुमति दी। यह तेल शिपमेंट के लिए सुरक्षित मार्ग के संकेतों के बाद है, जिससे भारत की एलपीजी की कमी की चिंता कम हो गई है। सरकार ने पर्याप्त घरेलू गैस आपूर्ति का आश्वासन दिया।