शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

इकबाल कासकर खंडणी प्रकरण; दाऊदचा हात आढळल्यास त्यालाही आरोपी करणार : ठाणे पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:23 IST

इकबाल कासकरला आज कोर्टात हजर केलं जाणार, या घटनेमध्ये दाऊद इब्राहिमचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू

ठाणे, दि. 19 - बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकरला तीन साथीदारांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी (18 सप्टेंंबर) रात्री उशीरा भायखळा येथून अटक केली. इकबाल कासकरला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. इकबाल कासकरने बिल्डरकडे चार फ्लॅटच्या स्वरुपात खंडणी मागितली होती, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या घटनेमध्ये दाऊद इब्राहिमचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू आहे, दाऊदचा सहभाग आढळल्यास त्यालाही या प्रकरणात आऱोपी केलं जाईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.  

बांधकाम व्यावसायिक जग्गू खेतवानी यांच्याकडे चार सदनिकांपेक्षा अधिक सदनिकांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री उशिरा भायखळा येथून अटक केली. ठाणे येथील खंडणीविरोधी पथकात चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांची अलीकडेच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कासकर याला अटक करून मोठी कारवाई केली आहे. कासकर याने ठाण्यातील बिल्डर खेतवानी यांच्याकडून खंडणीपोटी चार सदनिका वसूल केल्या होत्या. मात्र, त्याची भूक काही कमी न झाल्याने व तो आणखी सदनिकांची मागणी करत असल्याने बिल्डरने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, शर्मा यांनी भायखळा येथील कासकरच्या घरी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. कासकरला अटक करण्यासाठी तब्बल ४0 पोलीस, ८ कमांडो आणि बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा पोलिसांनी वापरला होता.खेतवानी यांनी ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गृहप्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाच्या जागेसंदर्भात वाद होता. या वादातूनच खेतवानी यांना खंडणी मागण्यात आली होती.

कासकर हा २००३ पर्यंत दुबईत वास्तव्य करीत होता. १९ मार्च २००३ रोजी त्याला विमानतळावर अटक करून त्याला मोक्का लावण्यात आला. दाऊदचे रिअल इस्टेटमधील व्यवहार सांभाळणा-या कासकरची २००७ मध्ये वेगवेगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी मुक्तता झाली. २०१० मध्ये छोटा राजन टोळीने त्याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो पोलिसांनी उधळला. भेंडीबाजार येथील पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी इमारत कोसळल्यानंतर भायखळा येथील डाबरवाला ही धोकादायक इमारत रिकामी करण्याचे आदेश महसूल विभागने दिले होते. त्यातच इमारतीत कासकर हा बेकायदा राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

काही पुढारीही रडारवरखंडणीच्या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावेही समोर आल्याचा गौप्यस्फोट पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केला. इकबाल कासकर आणि त्याच्या हस्तकांना या नेत्यांनी मदत केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. प्रथदर्शनी 3 ते 4 राजकीय नेत्यांचा सहभाग दिसत असून, त्यामध्ये काही नगरसेवक आणि काही त्यापेक्षाही जास्त वजनदार नेत्यांचा समावेश असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा