शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

खंडणी प्रकरणात इकबाल कासकरसह तिघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 4:10 PM

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकरला आणि त्याच्या तीन साथिदारांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाणे, दि. 19 -  बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकरला आणि त्याच्या तीन साथिदारांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल रात्री उशीरा इकबाल कासकरला तीन साथीदारांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने  भायखळा येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयातील सुनावणीनंतर कासकरचे वकील शाम केसवानी यांनी पत्रकारांसोबत बोलताना ही केस पूर्णतः खोटी असल्याचं म्हटलं. 

इकबाल कासकरला न्यायालयात नेण्यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली.  या घटनेमध्ये दाऊद इब्राहिमचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू आहे, दाऊदचा सहभाग आढळल्यास त्यालाही या प्रकरणात आऱोपी केलं जाईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.  

काही पुढारीही रडारवर-खंडणीच्या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावेही समोर आल्याचा गौप्यस्फोट पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केला. इकबाल कासकर आणि त्याच्या हस्तकांना या नेत्यांनी मदत केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. प्रथमदर्शनी 3 ते 4 राजकीय नेत्यांचा सहभाग दिसत असून, त्यामध्ये काही नगरसेवक आणि काही त्यापेक्षाही जास्त वजनदार नेत्यांचा समावेश असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले.

बांधकाम व्यावसायिक जग्गू खेतवानी यांच्याकडे चार सदनिकांपेक्षा अधिक सदनिकांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री उशिरा भायखळा येथून अटक केली. ठाणे येथील खंडणीविरोधी पथकात चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांची अलीकडेच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कासकर याला अटक करून मोठी कारवाई केली आहे. कासकर याने ठाण्यातील बिल्डर खेतवानी यांच्याकडून खंडणीपोटी चार सदनिका वसूल केल्या होत्या. मात्र, त्याची भूक काही कमी न झाल्याने व तो आणखी सदनिकांची मागणी करत असल्याने बिल्डरने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, शर्मा यांनी भायखळा येथील कासकरच्या घरी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. कासकरला अटक करण्यासाठी तब्बल ४0 पोलीस, ८ कमांडो आणि बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा पोलिसांनी वापरला होता.

खेतवानी यांनी ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गृहप्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाच्या जागेसंदर्भात वाद होता. या वादातूनच खेतवानी यांना खंडणी मागण्यात आली होती. कासकर हा २००३ पर्यंत दुबईत वास्तव्य करीत होता. १९ मार्च २००३ रोजी त्याला विमानतळावर अटक करून त्याला मोक्का लावण्यात आला. दाऊदचे रिअल इस्टेटमधील व्यवहार सांभाळणा-या कासकरची २००७ मध्ये वेगवेगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी मुक्तता झाली. २०१० मध्ये छोटा राजन टोळीने त्याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो पोलिसांनी उधळला. भेंडीबाजार येथील पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी इमारत कोसळल्यानंतर भायखळा येथील डाबरवाला ही धोकादायक इमारत रिकामी करण्याचे आदेश महसूल विभागने दिले होते. त्यातच इमारतीत कासकर हा बेकायदा राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

(फोटो सौजन्य - विशाल हळदे)