iPhone अलर्ट प्रकरणात सरकार अॅक्शन मोडमध्ये; CERT-in संस्था करणार तपास...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:13 PM2023-11-02T15:13:46+5:302023-11-02T15:14:45+5:30

31 ऑक्टोबर रोजी Apple आयफोन वापरणाऱ्या अनेक नेत्यांच्या फोनवर अलर्ट आला होता.

iPhone CERT-In starts probe into Apple threat notification matter | iPhone अलर्ट प्रकरणात सरकार अॅक्शन मोडमध्ये; CERT-in संस्था करणार तपास...

iPhone अलर्ट प्रकरणात सरकार अॅक्शन मोडमध्ये; CERT-in संस्था करणार तपास...

What Is CERT-in: दोन दिवसांपूर्वी(31 ऑक्टोब) अॅपल iPhone वापरणाऱ्या अनेक नेत्यांना अलर्टचा मेसेज आला होता. यानंतर विरोधकांनी सरकारवर हेरगिरीचे आरोप केले. आता याप्रकरणी सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. केंद्राने अॅपलला नोटीस पाठवली असून, CERT-in या प्रकरणाचा तपास करणार आहे. 

काय आहे CERT-in ?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे CERT-in नेमकं काय आहे? ते काय आणि कोणते काम करते? तर, CERT-in चे म्हणजे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, जी राष्ट्रीय नोडल एजन्सी आहे. ही संस्था संगणक सुरक्षा घटनांना प्रतिसाद देते आणि घटना का आणि कशी घडली, हे स्पष्ट करते. ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत येते.

CERT-in कडे 24/7 ऑपरेशन सेंटर आहे, जे संगणक सुरक्षा घटनांचे अहवाल प्राप्त करुन त्याबाबत आणि विश्लेषण करते. ही संस्था संबंधित घटनेबद्दल सरकारला माहिती देते आणि सायबर सुरक्षा जागरुकता वाढविण्याचे कार्यही करते. आता या संस्थेकडे अॅपल अलर्टच्या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.

Web Title: iPhone CERT-In starts probe into Apple threat notification matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.