शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 13:40 IST

एअर इंडियाचं भविष्य अंधारात असल्यानं वैमानिक आर्थिक विवंचनेत

नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाच्या वैमानिकांनी आता थेट मोदी सरकारला पत्र लिहून त्यांची व्यथा मांडली आहे. नोटीस पीरियड संपवण्याची आणि थकीत वेतन देण्याची मागणी वैमानिकांकडून करण्यात आली आहे. एअर इंडियाचं भविष्य अंधारात असल्यानं वैमानिक काम करण्याच्या स्थितीत नसल्याचं इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशननं (आयसीपीए) पत्रात नमूद केलं आहे.आयसीपीएनं नागरी उड्डाण राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनादेखील पत्र पाठवून त्यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. '३१ मार्च २०२० पर्यंत एअर इंडियाचं खासगीकरण न झाल्यास ही कंपनी बंद होईल, हे तुमचं विधान अतिशय चिंताजनक आहे,' असं आयसीपीएनं पत्रात म्हटलं आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांना देण्यात येणारी वेठबिगारासारखी वागणूक बंद करावी, अशी मागणीदेखील पत्रातून करण्यात आली आहे. 'वैमानिकांना वेठबिगारासारखं वागवणं बंद करा. त्यांना किमान नोटीस पीरियड न देता एअर इंडिया सोडण्याची परवानगी द्या. याशिवाय त्यांचं रखडलेलं वेतनदेखील लवकरात लवकर द्या,' अशा मागण्या पत्रातून करण्यात आल्या आहेत. वेतन वेळेवर मिळत नसल्यानं अनेक कर्मचारी ईएमआयदेखील भरू शकत नसल्याचं युनियननं म्हटलं आहे. उड्डाण भत्ता मिळत नसल्यानं प्रचंड नुकसान होत आहे. कारण हा भत्ता वैमानिकांच्या एकूण वेतनाच्या ७० टक्के इतका असतो, असंदेखील आयसीपीएनं पत्रात नमूद केलं आहे. जवळपास ८०० वैमानिक या संघटनेचे सदस्य आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAir Indiaएअर इंडिया