शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधींकडून काँग्रेस नेत्यांना मेजवानीसाठी निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 12:31 PM

आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर  राहुल गांधी यांनी आपली टीम बनवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर  राहुल गांधी यांनी आपली टीम बनवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधींनी काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते आणि विधायक दलाच्या नेत्यांना रविवारी संध्याकाळी मेजवानीसाठी निमंत्रित केले आहे. या मेजवानीमध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सन्मानप्रित्यर्थ या पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या मेजवानीचा मुख्य उद्देश टीम राहुलची बांधणी सुरू करणे हा असेल, जेणेकरून 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी योग्य पूर्वतयारी करणे हा असेल, असेही सांगण्यात येत आहे.   

- राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. 

अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली होती. 'एकदा आग लागल्यावर ती विझवणं फार कठीण, भाजपाचे लोक संपुर्ण देशात आग आणि हिंसा पसरवत आहेत. ही हिंसा रोखण्याती ताकद फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. राजकारण जनतेसाठी आहे, पण आज राजकारणाचा उपयोग जनतेसाठी नाही, त्यांच्या विकासासाठी नाही तर त्यांना चिरडण्यासाठी होतो', अस राहुल गांधी म्हणाले आहेत. आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार असल्याचंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं, प्रेमाचं राजकारण करु असं आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस