शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला निमंत्रण? गाव हॉटस्पॉट आणि खासदार पुत्राचे धुमधडाक्यात लग्न; उत्तरप्रदेशात नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 14:04 IST

CoronaVirus कोरोनामुळे कोंचच्या एसडीएम अशोक कुमार यांनी 12 जूनला पत्रक काढून लग्न सोहळ्याला केवळ 5 लोकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते.

जालौन : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला न जाता कर्तव्य पार पाडले म्हणून स्तुती केली होती. तर दुसरीकडे जालौन जिल्ह्यात रविवारी भाजपाचे खासदार भानू प्रताप वर्मा यांनी मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावले आहे. या विवाहसोहळ्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडविण्यात आले. धक्कादायक म्हणजे विवाह सोहळा असलेले ठिकाण हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले आहे.

कोरोनामुळे कोंचच्या एसडीएम अशोक कुमार यांनी 12 जूनला पत्रक काढून लग्न सोहळ्याला केवळ 5 लोकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते. आता भानू प्रताप वर्मा यांच्या या लग्नसोहळ्याने राज्यातील राजकारण तापू लागले आहे. यावर एसडीएम यांनी सांगितले की, खासदारांनी किती लोकांची परवानगी घेतली होती, याचा तपास केला जाईल. त्यानंतर अधिकृतपणे सांगता येईल. 

जालौन-भोगनीपूर-गरौठा येथून लोकसभेवर गेलेले भानु प्रताप वर्मा यांचे कोंचमध्ये घर आहे. रविवारी रात्री त्यांनी मुलगा महेंद्र याचे लग्न लावून दिले. यावेळी लग्नामध्ये लोक मास्क न वापरता वावरत होते. सोशल डिस्टंन्सिंगचीही काळजी घेतली गेली नाही. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लग्नामध्ये 50 हून अधिक लोक सहभागी होऊ शकत नाहीत. मात्र, या लग्नसोहळ्याला त्याहून खूप जास्त लोक सहभागी झाले होते. 

जालौन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 168 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. 113 जण बरे झाले असून 48 जणांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 33 जण हे खासदारांचे घर असलेल्या कोंचमधील आहेत. यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांनी या भागात लग्न सोहळ्याला केवळ वधुवराव्यतिरिक्त 5 जणांना परवानगी दिली होती. 

कुमारस्वामींनीही तोडलेले लॉकडाऊनचे नियमकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्नही असेच एप्रिलमध्ये थाटामाटात लावून देण्यात आले होते. यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले होते. तेव्हा अशा सोहळ्यांना परवानगीही नसताना सरकारकडून २१ कारना येण्याजाण्याची परवानगी देण्यात आली असल्याचा दावा कुमारस्वामींनी केला होता. निखिलचे लग्न हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसोहळा फार्महाऊसवर झाला, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले होते.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

India China FaceOff: चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश